१८ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीनी मतदान नोंदणी करून घ्यावी,उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांचे आवाहन
उदगीर विधानसभा मतदार संघातील आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी १ ऑक्टोबर २०२४ रोजी १८ वर्ष वय पुर्ण झालेल्या पात्र मतदारांनी मतदान नोंदणी करुन घ्यावी त्याकरीता आधार व कूंटूंबातील एका व्यक्तीचे मतदान ओळखपत्र व पात्र मतदारांचे फोटो या आधारे मतदान नोंदणी अधिकारी ( BLO ) यांच्या कडे दिल्यास मतदारांचे नावं मतदार यादी मध्ये नाव नोंदणी करुन घेता येईल. किंवा नजीकच्या महा ई सेवा केंद्रामध्ये / NVSP या संकेतस्थळावर किंवा ऑनराईड मोबाईलवर Voter helpline,हा अॅप डाउनलोड करुन स्वत: मतदार यादी मध्ये नाव नोंदणी करुन घ्यावी. जेने करुन आगामी विधानसभा २०२४ करीता निवडणूक आचार संहिता लागु होण्यापुर्वी १८ वर्ष वय पुर्ण होणा-या पात्र मतदार हे मतदार नोंदणीपासुन वंचित राहू नये व सर्व पात्र मतदार हे आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये मतदानाचे हक्क बजावण्यापासून वंचित राहणार नाहीत व सर्व मतदारांना आपले मौलीक मतदानाचे हक्क बजावता येईल व निवडणूकीमध्ये मतदानाचे हक्क बजावून लोकशाही सक्षमरित्या बळकट होईल असे आवाहन नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे व तहसीलदार राम बोरगावकर यांनी उदगीर व जळकोट मतदार संघातील सर्व पात्र मतदारांना मतदान नोंदणी करण्याकरीता आवाहन केले आहे.
0 Comments