Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

देऊळवाडी येथे हातात धारदार तलवार घेऊन केली दहशत निर्माण; एकाविरुध्द गुन्हा..

देऊळवाडी येथे हातात धारदार तलवार घेऊन केली दहशत निर्माण; एकाविरुध्द गुन्हा..

उदगीर : प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील देऊळवाडी येथे दहशत पसरविण्याचे उद्देशाने हातात लोखंडी तलवार घेऊन वावरत असतांंना मिळून आला. ही घटना मंगळवारी (८ ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी वाढवणा पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, देउळवाडी येथे लोकांमध्ये त्याची दहशत पसरविण्याच्या उददेशाने विनापरवाना बेकायदेशीरित्या लोखंडी तलवार स्वतःचे कब्जात बाळगुन जिल्हाधिकारी लातुर यांचे घातक शस्त्र जवळ बाळगण्यास मनाई असलेल्या आदेशाचे उल्लंघन करीत हातात ३२ इंच धारदार लोखंडी तलवार घेऊन वावरत असताना मिळुन आला.

याप्रकरणी पोलीस कर्मचारी संजय शिवाजी कलकत्ते यांच्या फिर्यादीवरुन वाढवणा पोलीस ठाण्यात बबन भगवान गडीकर (वय ३८ वर्षे रा. देउळवाडी ता. उदगीर) याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाॅस्टेबल इकराम उजेडे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात