Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

डोंग्रज शिवारात दसऱ्याला सोयाबीन बनीमचे दहन...उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा..

डोंग्रज शिवारात दसऱ्याला सोयाबीन बनीमचे दहन...
उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा..

उदगीर : प्रतिनिधी
उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या डोंग्रज (ता.चाकूर) शिवारात संगनमत करुन एकाची सोयाबीन बनीम जाळून ३० हजार रुपयांचे नुकसान केले आहे. ही घटना दसऱ्या दिवशी शनिवारी (१२ ऑक्टोबर) साडेसहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, डोंग्रज (ता.चाकूर) शिवारातील फिर्यादीचे मौजे डोंग्रज शिवारातील शेत सर्वे गट नं.८१ मधील ४६ आर क्षेत्रातील सोयाबीनचे बनीमला आरोपीनी संगणमत करुन आग लावुन जाळुन अंदाजे ३० हजार रुपयचे शेतीमालाचे नुकसान केले आहे. व तसेच फिर्यादीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
याप्रकरणी शेतकरी नारायण मरीबा कांबळे (रा. डेंग्रज ता. चाकुर हा मु. संजय नगर सोमनाथपुर रोड ,उदगीर) यांच्या फिर्यादीवरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कृष्णा दशरथ कांबळे, दशरथ रामचंद्र कांबळे (दोघे रा डोंग्रज ता चाकुर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाॅस्टेबल जगताप हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात