तिवटग्याळ पाटीवर दुचाकीला ईर्टीगा कारची धडक; दुचाकीवरील दोन्ही जखमी..
उदगीर : प्रतिनिधी
उदगीर - लातूर राज्य मार्गावरील तिवटग्याळ पाटीवर दुचाकीला इर्टीगा कारने समोरून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचे पाय मोडले तर महिला गंभीर जखमी झाली. याप्रकरणी मंगळवारी (१५ ऑक्टोबर) दुपारी दोनच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कार चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत रावसाहेब राठोड (वय २७ वर्षे, रा. शिवाजीनगर, तांडा ता. जळकोट) व संजीवनी पंडीत जाधव (वय २७ वर्षे रा संभाजी चौक, शिडको, नांदेड जि नांदेड) असे जखमीचे नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२५ सप्टेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास तिवटग्याळ पाटीवर आरोपीने त्याचे ताब्यातील ईर्टीगा कार क्रमांक एम.एच.२४ बी आर ३९७५ ही कार हयगय व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून फिर्यादी चालवत असलेली मोटारसायकल क्रमांक एम.एच.१२ आर इ.७३९५ या मोटारसायकलला समोरून जोराची धडक देवून फिर्यादीचा पाय मोडला व त्याचे पाठीमागे बसलेली संजीवनी जाधव हीचे डोक्यात मार लागून गंभीर जखमी होण्यास कारणीभूत ठरला.
याप्रकरणी चंद्रकांत रावसाहेब राठोड (रा. शिवाजीनगर, तांडा ता. जळकोट) यांच्या फिर्यादीवरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात इर्टीगा कार चालकाविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाॅस्टेबल एस.डी.भिसे हे करीत आहेत.
0 Comments