Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगिरात अवैध वाळूची वाहतूक करणारा टिप्पर पकडला,दोघांवर गुन्हा दाखल

उदगिरात अवैध वाळूची वाहतूक करणारा टिप्पर पकडला,दोघांवर गुन्हा दाखल

उदगीर/प्रतिनिधी
उदगीर शहरात अवैध वाळूची वाहतूक करणारा टिप्पर पोलिसांनी २६ नोव्हेंबर रोजी रात्री जप्त करून दोघा आरोपीवर उदगीर शहर पोलीस ठाण्यात महसूल कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की एम.एच.२६ सीएच ८८८० या क्रमांकाच्या टिप्पर मध्ये चार ब्रास वाळू आरोपीने संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाची परवानगी न घेता महसूल बुडवून ३२ हजार रुपयांच्या वाळूची टिप्पर मधून वाहतूक करीत असताना उदगीर शहरातील उमा चौक एच डी एफ सी बॅंके समोर २६ नोव्हेंबर रोजी रात्री मिळून आला.
टिप्पर मधील ३२ हजार रुपयांची वाळू व २५ लाखांचा टाटा कंपनीचा हायवा टिप्पर जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ सीताराम जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी केशव त्र्यंबक आढावा राहणार सुनेगाव ता.लोहा जिल्हा.नांदेड, व तिरुमला दिगंबर डिकळे राहणार पारडी ता.लोहा जिल्हा.नांदेड यांच्यावर उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुरंन ३१२/२४ कलम ३०३(२),३ (५) भारतीय न्याय संहिता सह कलम ४८ (७) (८) महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार २६ नोव्हेंबर रोज मंगळवारी रात्री १२ वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गायकवाड हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात