देवर्जन जवळ दुचाकी घसरली; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू..
उदगीर तालुक्यातील देवर्जन जवळ भरधाव वेगात असलेली दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी बुधवारी (२७ नोव्हेंबर) रात्री उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात मयत दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती की, २२ नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास देवर्जन ते उदगीर जाणाऱ्या रोडवर फिर्यादीचा मयत मुलगा नामे भिम अंकुश निडवंचे (वय ३३ वर्षे रा.गुरदाळ ता. देवणी) हा उदगीर ते करवंदी जाणारे रोडवर देवर्जणचे जवळ भरधाव वेगात हयगय व निष्काळजीपणाने हिरोहोन्डा कंपणीची मोटारसायकल क्र.एम.एच.२४, बी.एन.६१३० ही चालवत असताना, मोटारसायकल स्लिप होवुन रोडवर पडुन त्याचे डोक्याच्या मागील बाजुस मार लागुन डोक्यातुन व नाकातुन रक्त निघुन जखमी होवुन स्वतःचे मरणास कारणीभुत झाला आहे.
याप्रकरणी अंकुश निवृत्ती निडवंचे (रा.गुरदाळ ता. देवणी) यांच्या फिर्यादीवरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात मयत दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देवकत्ते हे करीत आहेत.
0 Comments