माजी राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते नागलगाव येथे विविध विकास कामाचा शुभारंभ
उदगीर:नागलगाव येथे मंजूर झालेल्या विविध विकास कामाचा शुभारंभ माजी राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. आमदार संजय बनसोडे यांनी आमदार झाल्यापासून उदगीर व जळकोट मतदार संघात अनेक विकासाची कामे मंजूर करून घेतली.उदगीर मतदार संघातील प्रत्येक गावात आमदार संजय बनसोडे यांच्या माध्यमातून अनेक कामे प्रगतिपथावर सुरू आहेत.नागलगाव येथील जलजीवन पाणीपुरवठा योजना ही माजी राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयत्नानेच मंजूर झाली.ही जलजीवन योजना मंजूर करून घेण्यासाठी नागलगावच्या तत्कालीन माजी सरपंच सौ अश्विनीताई वाघे यांनी नागलगाव व तांड्यासाठी जलजीवन पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेण्यासाठी आमदार संजय बनसोडे यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे आमदार संजय बनसोडे यांनी गावांसाठी जलजीवन पाणीपुरवठा योजना मंजूर करून दिली.जलजीवन पाणीपुरवठा योजना व विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कंपाउंड वॉल बांधकाम भिंतीचे आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले.याप्रसंगी गावातील नागरिक,आजी माजी विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन,आजी माजी सरपंच,व उपसरपंच होते
0 Comments