पशुधन विकास अधिकारी वर्ग एक पदावर नियुक्ती द्या: प्रशासकीय न्यायाधिकरण
औरंगाबाद: याचिककर्ता सुनील लोणगे याना पशुधन विकास अधिकारी वर्ग एक या पदावर नियुक्ती देण्यात यावी असे आदेश मा. प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद येथील मा.न्यायिक सदस्य वि. दा. डोंगरे आणि मा. प्रशासकीय सदस्य बीजय कुमार यांनी दिले आहेत.
थोडक्यात माहिती अशी की, एमपीएससी मार्फत 435 पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. निवड प्रक्रियेनंतर 428 उमेदवाराना नियुक्ती आदेश देण्यात आले. त्या पैकी एका निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्ती फौजदारी गुन्हा सिद्ध झाल्यामुळे रद्द केली होती. रद्द झालेल्या नियुक्ती बदल्यात प्रतीक्षा यादीतील उमेदवार बंधनकारक असताना देखील शासनाने त्या पदावर उमेदवार मागविण्यात यावे करिता काही कार्यवाही केली नाही. डॉ. सुनील लोणगे यांनी मी प्रतीक्षा यादीतील शेवटचा उमेदवार असून रद्द झालेल्या नियुक्ती पदावर त्यांची नियक्ती करण्यात यावी या करिता ऍड. अजिंक्य रेड्डी यांच्या मार्फत याचिका दाखल केली. सुनावणी वेळी, प्रतीक्षा यादी च्या वैधतेमध्ये नियुक्ती आदेश रद्द झाल्यास शासनाद्वारे प्रतीक्षा यादीतील उमेदवार निवडून त्यास नियुक्ती देने बंधनकारक आहे असा युक्तीवाद ऍड. रेड्डी यांनी केला. मा. प्रशासकीय न्यायाधिकरण यांनी सदर युक्तिवाद मान्य करत श्री लोणगे याना नियुक्ती आदेश देण्यात यावे असे आदेश दिले. श्री लोणगे एका सामान्य कुटुंबातील असून त्यांचे वडील वर्ग चार च्या पदावर कार्यारत आहेत. सदर प्रकरणी ऍड. अजिंक्य रेड्डी यांनी काम पाहिले .
0 Comments