Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

दारू पिण्यास पैसे का दिला नाहीस म्हणून एकास बाटलीच्या काचेने केले गळ्यावर वार

दारू पिण्यास पैसे का दिला नाहीस म्हणून एकास बाटलीच्या काचेने केले गळ्यावर वार

उदगीर:दारू पिण्यासाठी पैसे दे म्हणून एकास काचेच्या बाटलीने गळ्यावर वार करून जखमी केल्याची घटना भाजी मार्केट येथे घडली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की भाजी मार्केट येथे फिर्यादी दिनेश राम दामवाले हे भाजी विक्रीचा व्यवसाय करीत असताना आरोपी बबलू लक्ष्मण कांबळे यांनी फिर्यादीस दारू पिण्यासाठी पैसे मागितले फिर्यादीने माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितले असता आरोपीने रस्त्यावर पडलेल्या बाटलीचा काच हातात घेऊन फिर्यादीच्या गळ्यावर डाव्या बाजूस मारून जखमी केले व लथाबुक्याने मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.अशी फिर्याद दिनेश राम दामवाले यांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिल्यावरून आरोपी बबलू लक्ष्मण कांबळे यांच्यावर गुरंन 323/23 कलम 324,323,504,506 भादवी प्रमाणे 23 नोव्हेंबर रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या आदेशाने पोलीस हेडकॉन्स्टेबल गायकवाड हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात