नरसिंगवाडी पाटीजवळ झालेल्या अपघातातील,तरुणांचा उपचारा दरम्यान मृत्यू
उदगीर:तालुक्यातील नरसिंगवाडी पाटीजवळ उदगीर लातूर जाणाऱ्या रोडवर दुचाकी स्वरांचा अपघात झाल्याची घटना घडली होती या अपघातात दोघे जण जखमी झाले होते,यातील गोरखनाथ त्र्यंबक राठोड राहणार जाणवळ या तरुणांचा उपचारादरम्यान लातूर येथे मृत्यू झाला असून नामदेव पांडुरंग राहणार लोहारा यांच्यावर उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की नरसिंगवाडी पाटी जवळ एका दुचाकीचा अपघात झाला या अपघातात दोघे जण जखमी झाले होते जखमींना उदगीर येथील शासकीय सामान्य उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते दोघा पैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने गोरखनाथ त्र्यंबक राठोड यांना लातूरला हलवण्यात आले होते लातूर येथे गोरखनाथ त्र्यंबक राठोड यांचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला,अशी माहिती 24 नोव्हेंबर रोजी मयताचा नातेवाईक लक्ष्मण पवार यांनी दिली आहे
0 Comments