उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत यांचा मुस्लिम धर्मगुरूनी केला सन्मान
उदगीर:शहरात 19 व 20 नोव्हेंबर रोजी दोन दिवस तळवेस येथील नगरपरिषदेच्या प्रांगणात मुस्लिम समाजाचा तबलीगी इजतेमा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या वेळी पोलीस प्रशासनाने रात्रंदिवस आपली सेवा बजावून मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला सहकार्य केल्याबद्दल मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूनी उपविभागीय कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत,पोलीस निरीक्षक अरविंद पवार,पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम,सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित कुदळे,पोलीस उपनिरीक्षक देवकत्ते,पीएसआय अक्षय पाटील,पोलीस कर्मचारी भंडारी,पोलीस कर्मचारी महेश मुसळे यांचा मुस्लिम धर्मगुरूनी शाल व पुष्पहार घालून यथोचित सत्कार केला.यावेळी सिद्दीकी अब्दुल हाफिज,अब्दुल समद हाश्मी,सय्यद ईसा सय्यद मोइनूद्दीन,मोहियोद्दीन खुदबुद्दीन सय्यद,आदी मुस्लिम धर्मगुरूनी पोलीस प्रशासनाचा सत्कार केला.यावेळी ताहेर हुसेन,संजय राठोड सोमनाथपुरकर,पत्रकार अब्दुल नासीर बाशीर काझी,पत्रकार बसवेश्वर भीमराव डावळे,पत्रकार इरफान शेख ,पत्रकार संग्राम पवार,पत्रकार शमशेर गोलंदाज उपस्थित होते.
0 Comments