देवणी येथून दोन मुलासह महिला घरातून निघून गेली,देवणी पोलिसांत मिसिंग दाखल
देवणी:येथून दोन मुलासह महिला घरातून निघून गेल्याची घटना घडली आहे,देवणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की देवणी येथील समरन अझहर मल्लेवाल वय 25 वर्ष,मुलगा रहेमान अझहर मल्लेवाल वय 4 वर्ष,मुलगी सुमय्या अझहर मल्लेवाल वय 2 वर्षे तिघे हे देवणी येथून त्याच्या राहत्या घरातून 21 नोव्हेंबर रोजी अंगणवाडी येथे मुलांना डोस घेऊन येथे म्हणून घरातून दोन मुलासह निघून गेली आहे,वर्णन उंची 5 फूट 3 इंच, रंग गोरा,बांधा मध्यम, केस लांब,चेहरा लांबट, डोळे काळे,नाक फुगलेले,कपाळ रुंद,पायात चप्पल, गळ्यात सोन्याच्या पती,कानात रिंग,दोन्ही हातावरील मनगटावर जुनी जखम,अंगात काळ्या रंगाचा बुरखा, व सोबत एक 4 वर्षाचा मुलगा व दोन वर्षाची मुलगी असून देवणी पोलीस ठाण्यात 23 नोव्हेंबर रोजी 17/23 मिसिंग दाखल करण्यात आली आहे, या वर्णनाची महिला कोणास आढळल्यास 02382242296 व 02385269133 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक गुट्टे यांनी केले आहे.
0 Comments