*क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर जिल्हा दौरा*
लातूर, दि. 23 राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे 24 नोव्हेंबर 2023 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
ना. बनसोडे यांचे 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.30 वाजता लातूर येथे आगमन होईल व शकुंतला निवासस्थान येथे आगमन होईल. सकाळी 8 वाजता ते मोटारीने चाकूरकडे प्रयाण करतील. सकाळी 9 वाजता चाकूर येथे सराफा लाईन येथील जिजाऊ मोबाईल शॉपीच्या उद्घाटन समारंभास ते उपस्थित राहतील. सकाळी 9.20 वाजता चाकूर येथून उदगीर तालुक्यातील वाढवणा बु. गावाकडे प्रयाण कातील. सकाळी 9.45 वाजता वाढवणा बु. येथील सदगुरु संत बाळूमामा यांच्या पालखी दर्शनास उपस्थित राहतील.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांच्या हस्ते सकाळी 10.05 वाजता मौजे डांगेवादी-वाढवणा बु. मोड येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ते कामांचे भूमिपूजन होईल. दुपारी 12 वाजता मौजे हंगरगा-क्षेत्रफळ मोड येथे रा.मा.249 ते हंगरगा-क्षेत्रफळ रस्ता कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. दुपारी 2 वाजता मौजे रावणगाव येथे मोघा ते रावणगाव रस्ता कामाच्या भूमिपूजन सोहळ्यास ते उपस्थित राहतील.
उदगीर येथील राज-राजेश्वरी मंदिरासमोर दुपारी 4 वाजता ना. बनसोडे यांच्या उपस्थितीत रा.मा.63 ते चवळे तांडा, मल्लापूर ते मल्लापूर तांडा रस्ता कामाचे भूमिपूजन होईल. सायंकाळी 6 वाजता जळकोट येथे इजिमा-54 ते जिल्हा हद्द ते हिप्परगा रस्ता कामाच्या भूमिपूजन सोहळ्यास ते उपस्थित राहतील. सायंकाळी 6.30 वाजता जळकोट येथे शेलदरा-सोरगा-वडगाव-होकर्णा-वांजरवाडा ते रा.मा. 251 ते इजिमा-54 रस्ता कामाच्या भूमिपूजन सोहळ्यास ते उपस्थित राहतील. तसेच सोयीनुसार जळकोट येथून लातूरकडे प्रयाण करतील.
*****
0 Comments