Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयातील नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेल्या तीन विद्यार्थ्यांचा सत्कार

 छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयातील नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेल्या तीन विद्यार्थ्यांचा सत्कार   

उदगीर:श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार संपन्न झाला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बसवराज म.पाटील नागराळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी उदगीरचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, ब्लड बँकेचे अध्यक्ष रमेशअण्णा अंबरखाने, लोकमतचे पत्रकार व्ही एस कुलकर्णी, कमांडंट कमांडर बी के सिंह हे उपस्थित होते.
विद्यालयातील कुणाल आडे, आशुतोष बिरादार, आदित्य कावळे  यांची आंतरराष्ट्रीय इंडो-नेपाळ इंटर-स्टेट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी  निवड झाल्याबद्दल त्यांचा व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक शिवकुमार कोळ्ळे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
 पोखरा (नेपाळ) येथे टेनिस बॉल क्रिकेट चॅम्पियनशिप (मुले आणि मुली) 2022-23 साठी  भारतीय टेनिस बॉल क्रिकेट पुरुष आणि महिला दोन्ही संघ जात आहेत. या स्पर्धा दि. २९ डिसेंबर ते ०२ जानेवारी २०२३ या कालावधीत नेपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणित विषयाचे विभाग प्रमुख संतोष चामले यांनी केले तर आभार संजय निरणे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरविंद अकनगीरे, मैनोद्दीन सय्यद, प्रा. युवराज दहिफळे, प्रा. प्रदीप कोठारे यांनी परिश्रम घेतले.
या स्पर्धेसाठी कुणाल आडे, आशुतोष बिरादार, आदित्य कावळे या तीन विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल व यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक शिवकुमार कोळ्ळे, अविनाश बिरादार, शिक्षण निदेशक उमाकांत देवणे, बी टी पाटील, सुधीर गायकवाड, साईनाथ कांबळे यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस बसवराज म. पाटील नागराळकर, शालेय समितीचे अध्यक्ष दिलीप पाटील नागराळकर ,उपाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर , चेतन पाटील नागराळकर,कमांडंट कमांडर बी के सिंह, प्राचार्य वसंत कुलकर्णी, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के , विभाग प्रमुख प्रा. प्रदीप कोठारे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात