Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर शहरात मराठा भवन बांधकामासाठी १० कोटी सह मतदार संघातील इतर विविध विकासकामांसाठी ११ कोटी २० लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करुन द्यावा

उदगीर शहरात मराठा भवन बांधकामासाठी १० कोटी सह मतदार संघातील इतर विविध विकासकामांसाठी ११ कोटी २० लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करुन द्यावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निधी उपलब्ध करुन देण्याचे संबंधित विभागास निर्देश

क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री ना.संजय बनसोडे यांची माहिती

उदगीर : मतदारसंघातील उदगीर व जळकोट तालुक्यात व परिसरात मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. मराठा समाजाच्या वतीने आयोजित सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी तसेच प्रशासकीय कामे, गरजु विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था, अभ्यासाची सोय व ग्रामीण भागातील नागरीकांच्या व्यवस्थेसाठी एक सुसज्ज वास्तुची आवश्यकता असल्याने उदगीर शहरात मराठा भवन बांधकाम करण्यासाठी १० कोटीचा निधी मंजुर करावा अशी लेखी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री ना.संजय बनसोडे यांनी केली असुन सदर निधी लवकरच उपलब्ध करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी ना.बनसोडे यांना सांगितले असल्याची माहिती ना.संजय बनसोडे यांनी दिली आहे. 

उदगीर जि. लातूर येथे मराठा समाजाच्या सोई सुविधांसाठी मराठा भवन बांधकामास १० कोटी, जळकोट येथील मुस्लीम शादीखाना बांधकामासाठी अगोदर १.५० कोटी रु. मंजूर केले असुन सदर निधी अपुरा पडत असल्याने शादीखाना पूर्ण करण्यासाठी आणखीन वाढीव २ कोटीचा निधी द्यावा. मतदार संघात ९ कोल्हापुरी बंधारे व २ साठवण तलाव मंजूर करावे व जळकोट व उदगीर तालुक्यातील विविध गावांमध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह व बौद्ध विहार, सिमेंट रस्ता, पेव्हर ब्लाक करण्यासाठी ५ कोटी ५५ लक्ष रुपयाचा निधी तर उदगीर व जळकोट शहरातील विविध रस्ते करण्यासाठी विशेष रस्ता अनुदान योजनेतून ३ कोटी ६५ लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री ना.संजय बनसोडे यांनी केली आहे.

आपल्या मतदार संघाचा विकासाचा रथ अविरत पुढे नेण्यासाठी रात्रंदिवस ना.संजय बनसोडे काम करत असुन विविध योजनेच्या माध्यमातून जवळपास अडीच हजार कोटी रुपयाचा निधी शासन दरबारी पाठपुरावा करुन तो मतदार संघात खेचुन आणुन लातूर जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात उदगीर मतदार संघाच्या विकासाचा नवा 'पॅटर्न' ना.बनसोडे यांनी निर्माण केल्याने त्यांचे मतदार संघातील जनतेनी कौतुक करुन आभार व्यक्त केले आहेत. मी केवळ जनतेचे सेवक म्हणून जाहिरपणे सांगुन दर आठवड्याला सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवून प्रत्येकाच्या सुख - दु:खात ते धावुन जातात. रस्त्यात कुठेही थांबुन सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवणारे महाराष्ट्रातील ते एकमेव मंत्री असावेत सतत जनतेच्या कामात मग्न राहून मतदार संघात वेळ दिल्यानंतर मंत्री म्हणून मंत्रालयातही ते सकाळी १० ते रात्री उशिरा पर्यंत राज्यभरातुन येणा-या सर्व लोकप्रतिनिधीसह नागरिकांच्या अडचणी सोडवत असतात. मंत्रालयात १२ ते १४ तास काम करत असतात म्हणून त्यांना मतदार संघातील जनतेनी ' आपल्या हक्काचा भाऊ ' बरोबरच 'विकासरत्न ', ' विकासपुरुष ', ' समाजरत्न ', ' उदगीर - जळकोट भुषण'  या पदव्या नागरिकांनी त्यांना दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात