Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

चवनहीप्परगा ग्रामपंचायतीवर जालनाथ महाराज ग्राम विकास पॅनलचे वर्चस्व...

चवनहीप्परगा ग्रामपंचायतीवर जालनाथ महाराज ग्राम विकास पॅनलचे वर्चस्व...

देवणी:तालुक्यातील चवनहीप्परगा येथील सरपंच पद हे सर्वसाधारण प्रवर्गातील महीलासाठी राखीव असून.हे सरपंच पद लोक नियुक्त असल्याने चवहीप्परगा येथे सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी चार उमेदवार रिंगणात होते. यात माजी प्राध्यापक व्यंकटराव पाटील प्रेरीत व ॲड. दत्ता पाटील यांच्या जालनाथ महाराज ग्राम विकास पॅनलच्या सौ. शकुंतला मोहन मोरे यानी बहूजन ग्रामविकास पॅनलच्या सौ.दिपाली राम बिरादार यांना 124 मतानी पराभूत करित विजयी झाल्या आहेत. सुरूवातीपासूनच येथील ही निवडणूक अतिशय अटीतटीची होणार असा अंदाज मतदारातून व्यक्त केला जात होता. येथील सरपंच पदासाठी चार, महीला रिंगणात असल्याने बहूजन ग्रामविकास पॅनलच्या सौ.दिपाली राम बिरादार याना मोठा फटका बसला आहे.याचा फायदा मात्र मोरे याना मीळाला असून त्या निवडणूकीत त्या विजयी झाल्या आहेत. तर सदस्य पदासाठी जालनाथ महाराज ग्राम विकास पॅनलचे विमल दिलीप पीठाळे, राजश्री माधव बिरादार,इस्माईल अल्लाउद्दीन शेख,सविता चंद्रकांत कांबळे, पूजा बालाजी पिलगुरे, सत्यशीला श्रीधर कांबळे, तुळशीराम नामदेव तेलंगे, चांदपाशा मौलासाब शेख,आठ सदस्य विजयी झाले आहेत तर विरोधी पॅनलचे तातेराव नामदेव कांबळे हे निवडून आले आहेत.यामुळे जालनाथ महाराज ग्राम विकास पॅनलला स्पष्ट बहुमत मीळाले असून त्यानी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण करून फटाक्याच्या अतीषबाजीत गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त करण्यात आला.या निवडणूक प्रक्रियेत तहसीलदार गजानन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी एन गोपनवाड, साहयक निवडणुक निर्णय अधिकारी मोमीन नाजिम,व तलाठी,तहसील कर्मचारी आदीनी 6 नोव्हेंबर रोजी देवणी तहसील कार्यालयात मतमोजणी करून निकाल जाहीर केला.

Post a Comment

0 Comments

जाहिरात