Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर दौरा*

*क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर दौरा*

लातूर दि. 16  राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे रविवार, 17 डिसेंबर, 2023 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
ना. बनसोडे हे 17 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी 9 वाजता लातूर येथून मोटारीने उदगीरकडे प्रयाण करतील. सकाळी 10 वाजता उदगीर येथील श्यामलाल शैक्षणिक संकुल येथे हुतात्मा भाई श्यामलाल बलिदान दिन शोभायात्रेस हिरवा झेंडा दाखवून जागतिक शांतता संदेश देण्यासाठी उपस्थित राहतील. सकाळी 11 वाजता मादलापूर येथील उड्डाण पुलाच्या बाजूस बिदर रोडवरील डॉ. शंकरप्पा चलवा वेअर हाऊसच्या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहतील. दुपारी 12.55 वाजता उदगीर येथील रिंग रोडवरील ओम फंक्शन हॉल येथे डॉ. रमन रेड्डी यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहतील. दुपारी 1.30 वाजता बेलसकरगा येथे ज्ञानोबा देवराव बिरादार यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहतील.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे हे दुपारी 2 वाजता उदगीर शहरातील नळेगाव रोडवरील ललित भवन मंगल कार्यालय येथे बाबू सटवाजी गायकवाड यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहतील. दुपारी 2.15 वाजता उदगीर शहरातील जळकोट रोडवरील रुक्मिणी मंगल कार्यालय येथे संजीव सोमनाथ मळभागे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहतील. दुपारी 3 वाजता जळकोट शहरातील जांब रोडवरील द्वारकामाता मंगल कार्यालय येथे गंगाधर मारोती नामवाड यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहतील. दुपारी 3.30 वाजता जळकोट 
कृषि उत्पन्न बाजार समिती येथे जळकोट तालुका रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. सायंकाळी 6.05 वाजता उदगीर तालुक्यातील कौळखेड येथील शिरोळ जानापूर रोडवरील शिवम फंक्शन हॉल येथे सिध्देश्वर (मुन्ना) गुणवंतराव पाटील यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहतील. सायंकाळी 7.15 वाजता उदगीर तालुक्यातील हेर येथील निर्मलपूरी विद्यालय येथे भागवत शंकर गुरमे यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहतील. रात्री 8.52 वाजता उदगीर येथून पुणेकडे प्रयाण करतील.

Post a Comment

0 Comments

जाहिरात