त्या ४ मुलींच्या पुनर्वसनासाठी महिला व बालकल्यणचे पथक उदगिरात धाऊन आले..
उदगीर येथे शहरी बेघर निवारा येथे आश्रयास असलेल्या कर्नाटक राज्यातील त्या ४ अल्पवयीन मुलींना 15 डिसेंबर रोजी रात्री महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग लातूरच्या पथकाने उदगीर येथे धाव घेऊन त्या ४ मुलीचे योग्य ते पुनर्वसन करण्यासाठी व १८ वर्षापर्यंत त्यांची सर्व जबाबदारी स्विकारुन लातूर येथे घेऊन गेले.13 डिसेंबर रोजी रात्री भुकेने त्रस्त असलेल्या मुली निवाऱ्याच्या शोधात बस्थानक परिसरात इकडून तिकडे फिरत असल्याचे सुधाकर किशनराव नाईक यांच्या निदर्शनास आले त्यांनी मुली जवळ जाऊन त्यांची चौकशी केली असता त्या मुलींना मराठी भाषा येत नव्हती या घटनेची माहिती उदगीर येथील बेघर निवारा केंद्राला देण्यात आली. त्या चारही मुलींना बेघर निवारा केंद्रात नेऊन ठेवण्यात आले. या चार मुलींची बातमी दिव्य मराठी वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आली होती. या बातमीची दखल घेत लातूर महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी डी.व्ही. कांबळे यांनी उदगीर येथे पथक पाठविले. व १८ वर्षे वयोगटातील मुलांची काळजी व संरक्षण अधिनीयम २०१५ व नियम २०१८ या कायद्या अंतर्गत मुलाची काळजी व संरक्षणाची जबाबदारी जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे असल्याकारनाने सदर बालीकेचे योग्य ते पुर्नवसन करण्याची प्रक्रिया पुर्ण केली जाते. त्यामुळे सदर बालीकेचा ताबा जिल्हा बाल सरक्षण कक्षातील कर्मचारी श्रीमती एस.एस. इंगळे व बापू डी. सुर्यवंशी (चाईल्ड लाईन जिल्हा समन्वयक लातूर), रंजना पोळकर क्षेत्रीय कार्यकर्ते यांच्या ताब्यात देण्यात यावे. असे पत्र उदगीर येथील शहरी निवारा केंद्राचे सचिव गौस शेख यांच्या नावे देऊन त्या पथकाने त्या ४ मुली ताब्यात घेऊन 15 डिसेंबरच्या रात्री लातूरला रवाना झाले.
0 Comments