*एक देव मानुस, डॉ. रामप्रसाद नरसिंगदासजी लखोटिया*
उपेक्षितांच अंतरंग जाणून सेवा परमोधर्म या निरपेक्ष वृत्तीने सातत्यानं विविध क्षेत्रात सेवारत असलेलं सामाजिक बांधिलकीतून उतराई होण्यासाठी सतत प्रामाणिक पणे कौतुकास्पद धडपड करत विविध क्षेत्रातील कार्यात पूरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर रामप्रसाद नरसिंहप्रसाद लखोटिया. आज त्यांच्या वाढदिवस निमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं सिंहावलोन होणं गरजेचं आहे. विगत चाळीस वर्षाच्या सहवासात राहून आम्ही हे सेवाकार्य अवलोकन करत असताना प्रत्येक क्षण समाजाच्या सत्कार्यासाठी कसा उपयोगात आणायचा हाच ध्यास घेऊन ते कार्यरत असतात. "सूखी संसारी असावे /चित्त परब्रह्मी लावावे/चित्ती असू द्यावे समाधान/"समाज सेवा हीच ईश्वर सेवा समजून प्रत्येकाची अस्थेवाईक पणे चौकशी करत सस्मित चेहर्याने सेवारत राहणं हाच त्याचा स्थाई भाव राहिला आहे. कोरोनाच्या भयंकर संकट काळात देखील सकारात्मक दृष्टिकोनातून सामना कोरोनालाही पराभूत करत अत्यंत धैर्याने व धीरोदात्त पणे मुकाबला केला आणि कसलीही तमा न बाळगता पून्हा सेवाकार्य सहज गतीने चालू ठेवून अनेकांना धीर देत व सहकार्य करत आरोग्यसंपन्न पद्धतीने जगण्याचा मंत्र देत समाजात एक नवा आशावाद निर्माण केला. कौटुंबिक जीवनात डोकावून पाहिलं तरी सर्व प्रथम पितृदेवो भवः मातृदेवोभवः या वृत्तीने प्रतिदिन आईचे छायाचित्राचे दर्शन घेऊन च दिवसाची सुरवात होते. तद्वतच सातत्याने पित्याची सेवा जेवढी वेळ देउन करता येईल तेवढेच ते सतर्कतेने काळजी घेतात. संसारात पतीपत्नीचा सुसंवाद ही तेवढाच महत्वाचा असतो ते कौशल्य उभयता मध्ये भावनात्मक व व्यवहारिक दृष्टिकोनातून अत्यंत सुंदर रीतीने साधतात त्यामूळे उभयतामधील सामाजिक बांधिलकीचाही धागा मजबूत व दृढनिश्चयी झालेला दिसतो.शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल करीत आज त्यानी उत्कृष्ट पणे संस्थेची भौतिक व शैक्षणिक गरज ओळखून प्रगती साधलेली दिसत आहे. दिव्यांगासाठी उल्लेखनीय कार्य प्रगतीपथावर आहे.संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर जागतिक पातळीवर दिव्यदृष्टीदानाचा हा कार्यक्रम महाराष्ट्रा,आन्ध्र, कर्नाटक परिसरातील हजारो गोरगरीब माता भगिनींना दृष्टी उपलब्ध करून दिली आहे. "जगी ज्यास कोणी नाही /त्यास देव आहे "या उक्ती प्रमाणे आज हा दृष्टी दान यज्ञ अविरत परिश्रमाने चालू आहे.माहेश्वरी समाजासाठी देखील योगदान फार मोठे असून कोठल्याही शासकीय मदतीशिवाय आज शेकडो माता भगिनी आपल्या हक्काच्या घरात सुखेनैव आनंद घेत आहेत. नेत्र रूग्णालय ,दिव्यांग सेवा, शिक्षण, गृहनिर्माण, माहेश्वरी समाज ,गरूडरथ, शहरस्वच्छता अभियान, वाहतूक सूरक्षा, म.ज.वि.प.,वृक्षारोपण, पर्यावरण, अशा विविध क्षेत्रातील विकासात्मक उपक्रमात सहभाग व सहकार्य सदोदित चालूच असते. या सर्व सेवाकार्याची नोन्द घेऊन त्याना अनेक प्रतिष्ठित पूरस्कार प्राप्त झाले त्याची येथे देणं शक्य नाही. विविध ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करणे सतत चालूच असते. सर्व समावेशक व आनंद दायी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे.याचं मुख्य कारण म्हणजेच प्रेरणास्थान त्यांच्या सौभाग्यवती सौ.स्मिताताई यांच आहेत. त्यांच्या नावातलं स्मित यांच्या चेहऱ्यावर सतत झळकत राहतं. या महान निरपेक्ष वृत्तीने समाज कार्य करणाऱ्या लोभस व्यक्तिमत्वास 65 व्या वाढदिवस निमित्त लाख लाख शुभेच्छा.त्याचं मनःपूर्वक अभिनंदन व हार्दीक शुभेच्छा.आपणास सूदृढ निरामय दीर्घायुष्य लाभावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना.सतत हसत खेळत मजेत समाज कार्यात व्यस्त राहून आनंद घ्यावा एवढच..
ग्रंथ मित्र दीपक बलसूरकर उदगीर
0 Comments