Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

आठ लाखांसाठी विवाहितेला घरातून हाकलून दिले,सासरच्या सहा लोकांवर गुन्हा दाखल

आठ लाखांसाठी विवाहितेला घरातून हाकलून दिले,सासरच्या सहा लोकांवर गुन्हा दाखल

उदगीर:प्लॉट घेण्यासाठी विवाहितेला माहेरहून आठ लाख रुपये घेऊन ये म्हणून छळ केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या सहा लोकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कांचन संदीप उगडे वय 25 वर्ष राहणार कारवान आसिफ नगर हैद्राबाद ह. मु.एसटी कॉलनी उदगीर या विवाहितेला प्लॉट घेण्यासाठी माहेरहून आठ लाख रुपये घेऊन ये तुला काही कामधंदा येत नाही,तू दिसायला चांगली नाही असे म्हणून शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक छळ करून उपाशी पोटी ठेवून घरातून हाकलून दिले, व तू पुन्हा येथे आलीस तर खतम करून टाकतो असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली व 22 मार्च 2018 ते 26 जून 2022 पर्यंत विवाहितेचा पैशासाठी छळ करण्यात आला, कांचन संदीप उगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संदीप वसंतराव उगडे,लक्ष्मीबाई वसंतराव उगडे,दीपिका रोहन रेणके,पूजा वसंतराव उगडे,राहुल वसंतराव उगडे,रोहन रवींद्र रेणके सर्व राहणार असिफ नगर कारवान हैद्राबाद यांच्यावर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरंन 693/23 कलम 498,अ,323,504,506,34 भादवी प्रमाणे 16 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने पोलीस नाईक केंद्रे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात