Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

रोटी कपडा बँक, शहरी बेघर निवारा केंद्राला राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार प्रदान

रोटी कपडा बँक, शहरी बेघर निवारा केंद्राला राज्यस्तरीय  समाजसेवा पुरस्कार प्रदान 

उदगीर:रोटी कपडा बँक शहरी बेघर निवारा केंद्र उदगीर येथे  ज्या समाजसेवकांनी  कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा  स्वतःच्या परिवारातील मृत व्यक्तींना स्वतःच्या मुलाबाळांनी  नाकारले त्या मृत व्यक्तींचा जाती धर्माचा भेदभाव न करता त्या त्या धर्म पद्धतीने अंत्यसंस्कार केले याची दखल अवघ्या देशाने घेतली, तसेच बेघर वंचित वृद्ध यांना तत्पर सेवा देण्याचे कार्य ज्यांच्या हातून घडत आहे, अन्नदान असेल, पूरग्रस्तांसाठी मदत असेल, बेवारस मृत लोकांचा अंत्यसंस्कार करणे इत्यादी अनेक गोष्टींच्या बाबतीत जे महान कार्य ज्यांनी चालू ठेवला आहे त्यांना मा. मधुकरराव एकुर्केकर मित्र मंडळाच्या वतीने प्रथम पुष्प म्हणून  राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार देण्यात आला सदरील पुरस्कार जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर यांच्या शुभहस्ते देण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य भदंत नागसेन बोधी होते. यावेळी रोटी कपडा बँक व शहरी बेघर निवारा केंद्राचे सिद्दिकी असद जमाल, सिद्ध की खुर्चीत आलम, शेख गौस अहमद, शेख समीर, सिद्दिकी तह, शेख जावेद, नबीजी शाखेब, अब्दुल रहीम जावेद कादरी, इत्यादी पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला  या कार्यक्रमाला, प्रमुख पाहुणे म्हणून  विठ्ठल कोल्हे, बयाच बोरीकर, अविनाश गायकवाड,आकाश कस्तुरे, मुक्तदिर देवणीकर ,संजय काळे, श्रीनिवास एकुरकेकर, राहुल कांबळे, शिवा पकोळे,प्रेम गायकवाड,बालाजी कारामुंगे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार अविनाश गायकवाड यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात