Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

कल्लूर येथे महिला मळणी यंत्रामध्ये अडकल्याने डोके शरीरापासुन तुटुन शीर व धड़ झाले वेगवेगळे..

कल्लूर येथे महिला मळणी यंत्रामध्ये अडकल्याने डोके शरीरापासुन तुटुन शीर व धड़ झाले वेगवेगळे..

उदगीर : प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील कल्लूर शेत शिवारात तूरीची रास करीत असताना महिला मळणी यंत्रामध्ये अडकुन डोके शरीरापासुन तुटुन शीर व धड़ वेगवेगळे झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (२० जानेवारी) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी वाढवणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत महिलेचे नाव चंद्रकलाबाई आनंद काकडे (वय ५० वर्षे रा कल्लूर ता. उदगीर) असून या कल्लूर येथील शेत शिवारात जमीन सर्वे नं.१३ मध्ये तुरची रास करण्यासाठी शेताकडे गेली असता मळणी यंत्रामध्ये रास करीत असतना अचानक वारा सुटल्याने त्यांची साडीसह स्कार्फ मळणी यंत्रामध्ये अडकली. त्यांचे डोके मळणी यंत्रामध्ये मजबूत अडकल्याने त्यांचे धड शरीरापासुन तुटुन शीर व धड वेगवेगळे पडले त्यामुळे चंदकलाबाई काकडे यांचा जागीच मृत्यू झाला. 
याप्रकरणी शशीकांत किशनराव काकडे (रा. कल्लूर ता. उदगीर) यांच्या माहितीवरुन वाढवणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नं.३/२०२४ कलम १७४ सि.आर.पी.सी. प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल कसबे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात