चोंडी येथील युवकांचा कारच्या धडकेत लातूर येथे मृत्यू
उदगीर:तालुक्यातील चोंडी येथील तरुणांचा लातूर येथे कारच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना २० जानेवारी रोजी रात्री घडली आहे याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की श्याम शिवाजी पवार वय २७ वर्ष राहणार चोंडी तांडा ता.उदगीर हा युवक लातूर येथे हॉटेलवर काम करून एमपीएससी क्लासचे शिक्षण घेत होता.२० जानेवारी रोजी रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास मोटारसायकल क्रमांक एम.एच.२४ बी.एफ.८१४३ वरून चहा पिण्यासाठी खाडगाव येथून निघाले असता दयानंद गेट सिग्नल येथील ईदगाह मैदानाजवळ कार क्रमांक एम.एच.०४ जि.व्ही.५१५२ च्या चालकाने मोटारसायकलला जोराची धडक दिली या अपघातात श्याम शिवाजी पवार यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या मित्र रुपेश उमाकांत पांचाळ हा जखमी झाला आहे.शिवाजी लक्ष्मण पवार यांच्या फिर्यादीवरून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कार क्रमांक एम.एच.०४ जि.व्ही.५१५२ च्या चालकांवर कलम २७९,३३७,३३८,३०४(अ) १३४,१७७,१८४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments