*यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैक्तिक घरकुल योजनेत मतदार संघातील ५८ गावातील १४७३ कुटुंबांतील घरकुलांना मंजुरी*
*गोरगरीबांना पक्के घरे देण्याचे ना.बनसोडे यांनी दिले होते आश्वासन*
*उदगीर* : राज्य शासनाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत उदगीर - जळकोट मतदार संघातील एकुण १४७३ कुटुंबांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैक्तिक घरकुल योजनेत घरकुलांना मंजुरी देण्यात आली असुन एका घरकुलासाठी १.२० लक्ष रुपये तर १४७३ घरकुलांसाठी एकुण १७ कोटी ६७ लक्ष ६० हजार
देण्यात येणार असल्याची माहिती उदगीर मतदार संघाचे आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
यामध्ये उदगीर व जळकोट तालुक्यातील विविध गावातील ग्राम पंचायती अंतर्गंत ग्रामीण भागातील कुटुंबांना घरकुल योजना मंजूर करण्यात आली असुन यामध्ये
हकनकवाडी ता.उदगीर येथील - ८२ तर हाळी ता.उदगीर येथील - २०, शिरोळ जानापुर येथील - ९, येलदरा ता.जळकोट ०९, चेरा ता.जळकोट - १४, माळहिप्परगा ता.जळकोट - १६२, शिवाजीनगर तांडा ता.जळकोट - २२, रावणकोळा - ३२, मरसांगवी - ११, मंगरूळ - ०७, रामपुर तांडा - १७, जानापुर ता. उदगीर - ४९, तोंडचिर - ४८, पिंपरी - २६, मल्लापुर - ५४, अतनुर - ०३, उमरदरा - ८०, घोणसी - ३५, बोरगाव - १९, टाकळी - ०३, उमरगा रेतु - १६, तोगरी - २०, शेकापुर - ०५, अरसनाळ - ०१, उमरगा मन्ना - ०५, देवर्जन - ०४, माळेवाडी - ०६, दावणगाव - १७, होनिहिप्परगा - ४४, डोंगरशेळकी - १४०, हेर - ४४, चोंडी - २२, करवंदी - २९, शंभुउंबरगा - १०, लोणी - २६, खेर्डा - ०४, गुडसूर - १४, हिप्परागा ( डा.) - ०१, करडखेल - १०, बामणी - ०६, टाकळी - ०३, तोंडार - १८, कुमठा खुर्द - २८, देऊळवाडी - ३३, मुत्तलगाव - १६, सोनवळा - १२२, कोळनुर - ०४, बोरगाव खुर्द - ०९, केकतसिंदगी - ४७, डोंगरगाव - ०७, पाटोदा खुर्द - १०, मेवापुर - ०१, एकुर्का खुर्द - ०३, पाटोदा बु. - ०५, सुल्लाळी - १०, धामणगाव - ०६, शेलदरा - २५ असे एकुण ५८ गावातील १४७३ कुटुंबांना घरकुल योजना मंजूर झाली आहे.
मतदार संघातील गोरगरीबांना पक्के घरे
देण्यासाठी आपण गेल्या अनेक दिवसापासून प्रयत्नशील होतो. त्यातच माझ्या उदगीर - जळकोट तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना पक्के घरे मिळवून देण्यासाठी आपण ग्रामीण भागातील जनतेला आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पुर्तता करुन ग्रामीण भागातील एकुण १४७३ घरकुलांना मंजुरी देण्यात आली असुन यामुळे गरजू कुटुंबांना पक्के घरे दिल्याचे समाधान असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
उदगीर - जळकोट तालुक्यातील तब्बल १४७३ घरकुलांना मंजुरी दिल्याबद्दल त्या गावातील सरपंच व ग्रामस्थांनी ना.संजय बनसोडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
0 Comments