उदगीर तालुक्यातील १ हजार ४२२ निराधारांचे अर्ज मंजूर..
उदगीर : प्रतिनिधी
उदगीर तहसील कार्यालयात तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (१९ जानेवारी) संजय गांधी निराधार समितीची बैठक झाली. या बैठकीत १ हजार ८५ श्रावणबाळ तर ३३७ संजय गांधी निराधारचे लाभार्थ्यांचे अर्ज पात्र झाले असून तालुक्यातील एकुण १ हजार ४२२ निराधारांचे अर्ज मंजूर झाले आहेत.
विशेष सहाय्य योजनेअंतर्गत श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योनजचे १ हजार ४२२ लाभार्थी मंजुर झाले आहेत. ना.संजयजी बनसोडे (मंत्री क्रिडा व युवक कल्याण, बंदरे महाराष्ट्र राज्य) यांच्या सूचनेप्रमाणे व जिल्हाधिकारी लातूर, उपविभागीय अधिकारी उदगीर सुशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार उदगीर तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या अध्यक्षेखाली संजय गांधी निराधार समितीची बैठक तहसील कार्यालय उदगीर येथे घेण्यात आलेली असून यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना (अपंग, विधवा, परितक्त्या, अंतर्भुत पिडीत आजार इ.), श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनेच्या पात्र लाभार्थी यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत,
सदरील बैठकीस तहसीलदार रामेश्वर गोरे, मुख्याधिकारी नगर परिषद उदगीर, गटविकास अधिकारी पंचायत समिती उदगीर, श्री. संतोष धाराशिवकर, (नायब तहसीलदार, संगांयो संतोष धाराशिवकर, सौ. यु.पी. तिडके, अव्वल कारकून, संगांयो डी. आर. फुटाणे, समाधान कांबळे, उपस्थित होते.
0 Comments