महिलेचा शारीरिक व मानसिक छळ, सासरच्या पाच लोकांवर गुन्हा दाखल
उदगीर:वडीलाला दिलेले पैसे घेवून ये म्हणून महिलेला सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच लोकांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की.फिर्यादी महिला ज्योती हंसराज आमगे वय ३८ वर्ष राहणार लातूर फाटा नांदेड ह.मु.हमालवाडी उदगीर या महिलेला सासरच्या लोकांनी नवऱ्याने दिलेले पैसे वडिलांकडून घेवून ये म्हणून आरोपीने संगनमत करून पैशासाठी सतत तगादा लावून फिर्यादी महिलेस शिवीगाळ करून लाथाबुक्याने व चापटाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन उपाशी पोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला.ज्योती हंसराज आमगे यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात आरोपी हंसराज भाऊराव आमगे,सासू कमलाबाई भाऊराव आमगे,नणंद चांगोना ज्ञानोबा फावडे,नंदवाई ज्ञानोबा फावडे यांच्यावर गुरंन २०/२४ कलम ४९८ (अ),३२३,५०४,५०६,३४ भादवी प्रमाणे २० जानेवारी रोज शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चव्हाण हे करीत आहेत.
0 Comments