Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर व कर्नाटक राज्य उत्पादन शुल्क पथकांची निलंगा तालुक्यात अवैध मद्यावर धडाकेबाज कारवाई,

उदगीर व कर्नाटक राज्य उत्पादन शुल्क पथकांची निलंगा तालुक्यात अवैध मद्यावर धडाकेबाज कारवाई,

संयुक्त कारवाईत दोन लाख ७२ हजारांचा मुद्देमाल केला जप्त.

उदगीर:उदगीरचे राज्य उत्पादन शुल्क विभाग व कर्नाटक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने  निलंगा तालुक्यात अवैध मद्य विक्री करणाऱ्यावर संयुक्त धडाकेबाज कारवाई करत दोन लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.थोडक्यात माहिती अशी की राज्य उत्पादन शुल्क नांदेड विभागाचे विभागीय उपआयुक्त श्री.बी.एच.तडवी यांनी दिलेल्या निर्देशानुसार व लातूर जिल्ह्याचे अधिक्षक केशव गो.राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर विभागातील निलंगा तालुक्यातील कोराळी येथे २८ मार्च रोज गुरुवारी सकाळी छापे टाकून हातभट्टी निर्मिती करण्याचे ६१०० लिटर रसायन,३५० लिटर हातभट्टी दारू,रसायन वापरण्यासाठी  ५०० लिटर क्षमतेचे ११ प्लॅस्टिक बॅलर,२०० लिटर क्षमतेचे ३ बॅलर असा एकूण दोन लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, सदरची कारवाई उदगीर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रमेश चाटे,भरारी पथक निरीक्षक टी.एस.कदम,दुय्यम निरीक्षक एन.पी.रोटे,श्रीमती मोनिका पाटील,श्रीमती रेणुका सलकर,सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, जवान कलमले,गवंडी, चांदेणे, एस.जी.बागेलवाड,संतोष केंद्रे,विक्रम परळीकर, कासार शिरसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस.सी.भुजबळ, पोलीस हेडकॉन्स्टेबल घोरपडे, शिरसाट, लवटे, नागमोडे, सोनटक्के, कर्नाटक राज्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक रवी मुरगडे, बिदरचे निरीक्षक गोपाल पंडित,शब्बीर बिरादार, राविकुमार पाटील,दुय्यम निरीक्षक सादिक पाश यांच्या पथकाने महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग व कर्नाटक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने संयुक्त धडाकेबाज कारवाई करून मोठ्या प्रमाणावर अवैध मद्य साठा जप्त केला आहे.मार्च महिन्यात उदगीरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सतत अवैध मद्य विक्री करणाऱ्यावर लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाया केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात