Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मनुष्यबळाची पहिली सरमिसळ प्रक्रिया पूर्ण*

*लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मनुष्यबळाची पहिली सरमिसळ प्रक्रिया पूर्ण*

• मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची नियुक्ती

लातूर, दि. 30 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार 41- लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. याकरिता मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात येणाऱ्या मनुष्यबळाची निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे पहिली सरमिसळ प्रक्रिया जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत 29 मार्च 2024 रोजी झाली. याद्वारे मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्र. अपर जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षाचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, माहिती व तंत्रज्ञान कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी प्रदीप डूमणे, एन. डी. आगावणे, निवडणूक नायब तहसीलदार पंकज मांदाडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

मतदान केंद्रांवर नियुक्तीसाठी जिल्ह्यात एकूण 13 हजार 526 अधिकारी, कर्मचारी यांच्या नावांची डाटा एन्ट्री करण्यात आली आहे. यामधून मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी आणि इतर मतदान अधिकारी यांची नियुक्ती करण्याबाबत मनुष्यबळाची पहिली सरमिसळ करण्यात आली. त्यानुसार आता संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीचे आदेश वितरीत करण्याची कार्यवाही होणार आहे.
*****

Post a Comment

0 Comments

जाहिरात