Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

तोंडार पाटी,वंजारवाडी येथे वंचित लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप

तोंडार पाटी,वंजारवाडी येथे वंचित लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप

उदगीर: जिल्हाधिकारी कार्यालय  अंतर्गत उदगीर तहसील कार्यालय  यांच्या वतीने भटक्या विमुक्त जाती व जमाती मधील वंचित लाभार्थ्यांना  विविध प्रकारचे दाखले वाटप करण्यात आले, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांच्या सूचनेनुसार तहसीलदार राम बोरगावकर यांच्या हस्ते तोंडार पाटी व वंजारवाडी येथे विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.भटक्या जाती जमातीतील लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले  व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तशा सूचना प्रशासनातील अधिकारी व स्थानीक पातळीवरील कर्मचारी यांना देण्यात आल्या,भटक्या विमुक्त जाती जमातीतील वंचित असलेल्या लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या.यावेळी नायब तहसीलदार एस.पी.बेंबळगे,मंडळ अधिकारी कैलास उडते ,मंडळातील सर्व तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तोंडार येथील मतदार यादीप्रमाणे सर्व बीएलओ,आशा ताई,अंगणवाडी सेविका, माधव पाटील,शिवलिंग नावंदे,आनंदराव मालोदे,मसना सुरनर निळकंठ बिरादार महा-ई-सेवा केंद्राचे राहुल रक्षाळे,संग्राम बिरादार,पुंडलिक जाधव,भटक्या विमुक्त जाती जमातीच्या विविध संघटनेचे पदाधिकारी व महिला पुरुष उपस्थीत होते.तोंडारचे सरपंच भरत कोचेवाड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात