Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेला उस्फूर्त प्रतिसाद

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेला उस्फूर्त प्रतिसाद

अतनूर / प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील अतनूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत २८ गावे व ५ उपकेंद्र येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अतनूर परिसरातील मेवापूर, रामपूर, शिवाजीनगर,भवानीनगर, अतनूर, गव्हाण, गुत्ती, घोणसी, तिरूका उपकेंद्र तसेच ग्रामपंचायत या बुथवर वेगवेगळे आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, आंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस कार्यरत होत्या. पोलिओ लसीकरण मोहीम सकाळी 8 ते 5 या वेळेत राबविण्यात आली होती.या मोहिमेत ० ते ५ वयोगटातील अपेक्षित लाभार्थी संख्या ३००४
० ते ५ वयोगटातील २७७६ लाभार्थींना लस पाजण्यात आली.
५ वर्षांवरील ६० लाभार्थींना लस पाजण्यात आली. मुलांना लसीकरण करण्यात आले. पोलिओ आजाराच्या उच्चाटनासाठी गावकऱ्यांनी यावेळी सहभाग नोंदवला. यावेळी लेक लाडकी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. सर्व पालकांना या योजनेविषयी माहिती दिली. लसीकरण मोहीम पार पाडण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अतनूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम सागडे, आरपीआयचे जळकोट तालुका अध्यक्ष विनोद कांबळे, एल.एच.व्ही. श्रीमती सुदर्शना चवळे, स्टाफ नर्स श्रीमती सी.एच.सुळकेकर, श्रीमती एल.डी.मेंडे, डाटा अपरेटर सुनिल खुपसे, आरोग्य सहाय्यक बालाजी सोनटक्के, सेवक गोटू गायकवाड, पंढरी घोडके, सर्व आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक, परिचारिका, आशाताई, आंगणवाडीताई, ग्राहक संरक्षण परिषदेचे शासन नियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर, साधुराम ग्रामीण विकास बहुद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर, जिजामाता महिला मंडळ अतनूर, वसुंधरा महिला मंडळातील स्वयंसेवक, आरोग्य मित्र बी.जी.शिंदे अतनूरकर, स्वयंस्फूर्त स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात