नागलगाव परिसरात ग्रामीण पोलिसांचा गावठी हातभट्टी दारूवर छापा,29 हजारांचा मुद्देमाल केला नाश
उदगीर तालुक्यातील नागलगाव परिसरात गावठी हातभट्टी दारू मोठ्या प्रमाणावर तयार होत असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली,मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ग्रामीण पोलिसांनी नागलगाव परिसरातील शेतशिवारात 4 मार्च रोज सोमवार सकाळी छापा टाकला असता गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे गूळ मिश्रित 650 लिटर रसायन व 50 लिटर हातभट्टी दारू असा एकूण 29 हजारांचा माल नष्ट करून आरोपीविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरंन 126/24 कलम 65 ड ई महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी, पोलीस हेडकॉन्स्टेबल बिरादार, पोलीस हेडकॉन्स्टेबल धूळशेट्टे,पोलीस शिपाई गायकवाड,पोलीस नाईक जगताप, पोलीस उपनिरीक्षक चौधरी यांच्या पथकाने केली आहे
0 Comments