तोंडचिर परिसरातून अल्पवयीन मुलीस पळविले,ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद
उदगीर:तालुक्यातील तोंडचिर परिसरातून एका अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना घडली याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की तोंडचिर परिसरातून फिर्यादीच्या १५ वर्ष ४ महिने १७ दिवसाच्या मुलीला अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची फिर्याद मुलींच्या वडिलांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून अज्ञातावर गुरंन १२५/२४ कलम ३६३ भादवी प्रमाणे ४ मार्च रोज सोमवारी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवकत्ते हे करीत आहेत.
0 Comments