उदगिरात एकावर खंडणीचा गुन्हा दाखल
उदगीर,शहरातील देगलूर रोड जवळ एकास लाथा बुक्याने मारहाण करून खंडणी मागितल्या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात खंडणीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की उदगीर शहरातील देगलूर रोडवर मीनाक्षी बारच्या जवळ फिर्यादी ज्ञानेश्वर बालाजी पेदेवाड वय ३० वर्ष राहणार नळगीर तालुका उदगीर यांना आरोपीने फिर्यादीस लाथा-बुक्क्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.व स्वतःच्या फायद्यासाठी फिर्यादी कडून खंडणीच्या स्वरूपात २५ हजार रुपये मागितले पैसे नाही दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात २७ जानेवारी २०२५ रोजी आरोपी अजय डोणगावकर व एका अनोळखी इसामाच्या विरोधात गुरंन २७/२५ कलम ३०८(२)११५(२)३५१(२)३५१(३)३५२(३) भारतीय न्याय संहिता नुसार खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,आरोपी फरार असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक पि.डी मोहिते हे करीत आहेत.
0 Comments