उदगिरात जुगाराच्या अड्ड्यावर छापा; रोख ७ हजार ५०० रुपये जप्त..
उदगीर : प्रतिनिधी
उदगीर शहरातील देगलूर रोडवरील पालीवाल काॅम्पलेक्स येथे जुगार खेळत व खेळवित असताना जुगाराचे साहित्य व रोख ७ हजार ५०० रुपयांसह मिळून आले. याप्रकरणी सोमवारी (१० फेब्रुवारी) रात्री उशिरा उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १० फेब्रुवारी रोजी रात्री आठच्या सुमारास शहरातील रेड्डी कॉलणी उदगीर येथे पालीवाल यांचे इमारतीच्या ओसरी मध्ये आरोपीतांनी विनापास परवाना ताश पत्यावर पैसे लावून तिर्रट नावाचा जूगार खेळत व खेळवित असताना रोख रक्कम ७ हजार ५०० रुपये व जुगाराचे साहीत्यासह मिळून आले.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी राजकुमार रमेश देवडे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात बबन सोपानराव जाधव (वय ५८ वर्षे रा तोंडीचीर), भाउराव दिगंबर लाळे (वय ६५ वर्षे रा श्रीकृष्ण कॉलणी उदगीर), माधव शेषेराव सुर्यवंशी (वय ६१ वर्षे रा निडेबन ता उदगीर) केशव गंगाराम जाधव (वय ७४ वर्ष रा रेड्डी कॉलणी उदगीर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल आर.एन.चिमोले हे करीत आहेत.
0 Comments