राज्यस्तरीय ड्रेस डिझाईन स्पर्धेचे थाटात उद्घाटन,
ड्रेस डिझायनिंग मध्ये नारायणा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन स्केचिंग स्पर्धेमध्ये दयानंद कॉलेज प्रथम
उदगीर;नारायणा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन उदगीरच्या वतीने घेण्यात आलेला राज्यस्तरीय ड्रेस डिझाईन व स्केचिंग स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय 175 मुलींना सहभाग नोंदविला होता दिनांक 01 फेब्रुवारी 2025 रोजी वृंदावन गार्डन व मंगल कार्यालय या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन केले होते सकाळी ठीक अकरा वाजता स्केचिंग या स्पर्धेचे उद्घाटन प्रा राम गायकवाड यांच्या मातोश्री गुंडाबाई नारायण गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले स्केचिंग स्पर्धेसाठी राज्यभरातून 25 मुलींनी सहभाग नोंदविला होता या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी पुणे येथून प्रा.शुभांगी जवळगेकर प्रा.सुवर्णा लवंग या उपस्थित होत्या दुपारी ठीक 12:30 वाजता ड्रेस डिझाईन या स्पर्धेचे उद्घाटन बीड येथील नालंदा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा प्रदीप रोडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला या कार्यक्रमासाठी पूर्ण येथील संस्कृती महाविद्यालयाचे प्राचार्य केशव जोंधळे , डॉ सुलोचना येरोळकर, श्रीमती पैकी मॅडम भगवान गायकवाड ,शिवाजीराव लकवाले, प्रा.शरद वंजारे प्रा महादेव खताळ उमाकांत गुनाले आदी उपस्थित होते प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप लावून उद्घाटन करण्यात आले व एस. एन.डी.टी. चे कुलगीताने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा राम गायकवाड सर यांनी कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा.प्रदीप रोडे सर यांचा सत्कार शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रारंभ गायकवाड यांच्या सत्कार प्रा उमाटे सर यांनी केला प्राचार्य केशव जोंधळे यांचा सत्कार प्रा बच्चेवार सर यांनी तर डॉक्टर येरळकर मॅडम यांचा सत्कार प्रा रूपाली साबळे मॅडम यांनी तर पैके मॅडम यांचा सत्कार प्रतीक्षा माने मॅडम यांनी केला प्रा भगवान गायकवाड यांचा सत्कार प्रवास सुधीर शिंदे सर तर शिवाजी लकवाले सर यांचा सत्कार प्रा गौरव सर यांनी केला प्रा.शरत वंजारे यांचा सत्कार गोपाळ तळेगावकर यांनी केला कार्यक्रमाचे स्वागत गीत सुधीर कुलकर्णी व त्यांच्या संघाने सादर केला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा भगवान गायकवाड मांडताना संस्थेच्या विकासाचा आलेख मांडला कमी वेळेमध्ये गरुड झेप घेताना उदगीर सारख्या शहराच्या शैक्षणिक चळवळीमध्ये एक पाऊल पुढे अशा पद्धतीने कार्य नारायणा कॉलेज करीत आहे. डॉ येरोळकर मॅडम हे आपले मत मांडताना म्हणाले की ग्रामीण भागातील मुलींना ताठ मानेने जगता येईल ज्या होतकरू मुली आहेत त्यांना संधी निर्माण करून देण्याचे काम नारायणा कॉलेज करत आहे अगदी कमी वेळात सर्वसामान्य यांच्या मुलींना ड्रेस डिझाईन मध्ये संधी मिळवून देत त्यांच्या कल्पनांना वाव देण्याचे काम त्यांच्या राहणीमान त्यांचे आर्थिक व सामाजिक जीवन उंचावण्यामध्ये काम नारायणा कॉलेज करत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे असे मत पैकी मॅडम यांनी व्यक्त केले उद्धारकीय मत व्यक्त करताना प्रा. प्रदीप रोडे यांनी आम्ही जगाला गवसणी घातली पाहिजे जगातल्या अनेक देशांमध्ये आम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत जापनीज कोरियन अशा अनेक भाषांचा अभ्यास केला पाहिजे या क्षेत्रामध्ये खूप वाव आहे याला आम्ही जोपासले पाहिजे आणि आम्हाला आमच्या उद्धार करून घेतला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले प्रा.राम गायकवाड सर आपल्या अध्यक्षीय समारंभामध्ये मुलगी जगली पाहिजे ते टिकली पाहिजे ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे म्हणून आतापर्यंत 200 शिलाई मशीनचे वाटप केले आहे विद्यार्थिनींनी केंद्रस्थानी ठेवून ती शिकली पाहिजे तिचे स्वलीकरण झाले पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही व आमचे सर्व कर्मचारी मिळून काम करत आहोत आणि त्याला आपल्या सर्वांची सहकार्यही आहे याचा मला मनस्वी आनंद आहे.
राज्यातून ड्रेस डिझाईन्स स्पर्धेसाठी एकूण 175 स्पर्धक आले होते खादीपासून बनवलेला ड्रेस ही थीम दिली त्यांचे प्रशिक्षण दयानंद कला महाविद्यालय येथील हर्षा जैन मॅडम बेंगलोरच्या सीईओ श्रद्धा सोनटक्के,एस.जी.जी.एस नांदेडचे प्रा.संगणवार सर यांनी प्रशिक्षण केले तर स्केचिंग स्पर्धेचे प्रशिक्षण दयानंद महाविद्यालयाच्या प्रा सुवर्णा लवंग मॅडम कर्मवीर सीनियर कॉलेज पुणे येथील जवळगेकर शुभांगी मॅडम यांनी केले. ड्रेस डिझाईन स्पर्धेमध्ये नारायणा कॉलेज चव्हाण रूपाली व बळकुंदे अंबिका यांनी प्रथम क्रमांकाचे दहा हजार रुपये रोख प्रमाणपत्र व शील्ड प्राप्त करण्यात आली ,दयानंद कॉलेज लातूरच्या खरपे स्वप्नाली हिने 7000 रुपये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक व प्रमाणपत्र शिल्ड प्राप्त केले तर तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक 5000, अंबाजोगाईच्या काव्या महिला महाविद्यालयाची कराड अंजली हिने प्राप्त केले ड्रेस डिझाईन स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ संभाजीनगर च्या शासकीय निवासी मुलींच्या, प्रतीक्षा जीवन साधना इन्स्टिट्यूट नांदेड, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईन कासारशिरशी यांनी पटकावले स्केचिंग स्पर्धेमध्ये दयानंद महाविद्यालयाच्या कुमारी वाघमारे क्रांती हिने पाच हजार रुपये रोग प्रमाणपत्र मिळून प्रथम क्रमांक मिळवला आहे तर नारायणा कॉलेज उदगीर सूर्यवंशी श्रुती घेणे 3000 रुपये रोख प्रमाणपत्र मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तर दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स लातूर कुमारी वेल्लापल्ली श्री लक्ष्मी हिने रोक दोन हजार रुपये प्रमाणपत्र मिळवून तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केले तर उत्तेजनार्थ जीवन साधना इन्स्टिट्यूट नांदेड दयानंद कॉलेज लातूर तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीड यांनी बक्षीस मिळवले वृंदावन गार्डन व मंगल कार्यालय येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास उदगीर शहरातील मान्यवरांची हजेरी लावली राज्यातील उपस्थित असलेल्या सर्व मुलींना रॅम्प केला आणि कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पुजा कचवे मॅडम यांनी केले तर आभार प्राचार्य रूपाली साबळे मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.गौरव बच्चेवार, प्रा.सुमेधा साळवे, प्रा.प्रतीक्षा माने, प्रा, गायत्री नंदगावे प्रा. गोपाळ तळेगावकर, डीएन गायकवाड ,सुधीर शिंदे, शिवलिंग बोधले, बाबासाहेब गायकवाड व इतर कर्मचारी यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला
0 Comments