Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

महादेव मंदिर येथील पाणंद रस्त्याचा प्रश्न १५ दिवसात मार्गी लावू,

महादेव मंदिर येथील पाणंद रस्त्याचा प्रश्न १५ दिवसात मार्गी लावू,

उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांचे नागरिकांना आश्वासन

उदगीर/प्रतिनिधी
उदगीर:शहरातील जळकोट रोड ते महादेव मंदिर देगलूर रोड पर्यंतचा निजामकालीन शासकीय पाणंद रस्ता मोकळा करावा अन्यथा उपोषण करू या  मागणीचे निवेदन ५ फेब्रुवारी रोजी स्थानिक नागरिकांनी उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिले होते,दिलेल्या निवेदनाचा विचार करून उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी ६ फेब्रुवारी रोज गुरुवारी सकाळी ११ वाजता स्थानिक नागरिकांची बैठक त्यांच्या दालनात बोलावण्यात आली होती,या बैठकीत स्थानिक नागरिकांने महादेव मंदिर ते देगलूर रोड पर्यंतच्या शासकीय पाणंद रस्त्याची समस्या उपजिल्हाधिकारी यांच्या समोर  मांडली,उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेत शासकीय पाणंद रस्त्याच्या बाबतीत संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन येत्या १५ दिवसात महादेव मंदिर ते देगलूर रोड पर्यंतचा पाणंद रस्ता खुला करून देण्याचे आश्वासन या बैठकीत स्थानिक नागरिकांना दिले,आपण उपोषणाचा मार्ग अवलंबू नये  प्रशासनास सहकार्य करावे  असेही स्थानिक नागरिकांना बैठकीत बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात