उदगिरात प्लाॅट देतो म्हणून ४ लाख १५ हजार रुपये उकळले..
उदगीर : प्रतिनिधी
उदगीर नगर परिषद हद्दीतील प्लाॅटची बयानापोटी सर्वच रक्कम दोन टप्प्यात ४ लाख १५ हजार रुपये घेऊन सदरचा प्लाॅट दुसऱ्याला कोर्ट डिक्री आधारे विक्री करुन एकाची फसवणूक केली. याप्रकरणी बुधवारी (५ फेब्रुवारी) दुपारी तीनच्या सुमारास उदगीर शहर पोलीस ठाण्यात एकाविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, २४ जून २०२१ रोजी आरोपीने त्याचे मालकीचा उदगीर नगरपरिषद हद्दीतील जमीन सर्वे नं.२११/१ व नगर परिषद मिळकत नं २-२-२५२१ प्लाॅट नं.२० ज्याचे क्षेत्र पु.प.४८ फुट व द.उ. २८ फुट हा विकायचा आहे. तूम्ही घेता का असे फिर्यादिला म्हणाला फिर्यादिने प्लाट घेण्यासाठी इसारा पोटी २ लाख रुपये नगदी स्वरुपात दिले त्यानूसार शंभर रुपयांचे बाँडवर ठराव पत्रक करून घेतले. व १८ फेब्रुवारी २०२२ रोजी उर्वरीत रक्कम २ लाख १५ हजार रुपये रोख दिले. त्यानूसार शंभर रुपयांचे बाँडवर ठराव पत्रक करून घेतले व न.प. उदगीर येथे गुंठेवारी प्रमाणपत्र भेटल्यानंतर प्लाॅट नावावर करून देतो असे ठराव पत्रकात लिहून दिले पण फिर्यादीस प्लाॅट नावावर करून दिला नाही. फिर्यादि विचारण्यास गेला असता टाळाटाळ करू लागला व फिर्यादिने २३ जून २०२४ पावेतो दिलेल्या पैशाची मागणी केली असता दिले नाही व फिर्यादिच्या परस्पर आरोपीने सदरचा प्लाट हा दूस-याला कोर्ट डीक्री व्दारे करून देवून फिर्यादिची फसवणूक केली आहे.याप्रकरणी आबेद अब्दुला शेख (रा. इंडिया नगर उदगीर) यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.३५/२०२४ कलम ४२० नुसार मोबीन सोफी मिरदे (रा.दबीरपुरा उदगीर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोहिते हे करीत आहेत.
0 Comments