अतनूरचे भूमिपुत्र संजय पंचगल्ले झाले बीडचे शिक्षणाधिकारी
जळकोट तालुक्यातील अतनूर येथील भूमिपुत्र संजय शिवराज आप्पा पंचगल्ले यांची शिक्षणाधिकारी म्हणून पदोन्नती झाली असून ते बीड येथे शिक्षणाधिकारी यापदी रुजू झाले आहेत.
संजय पंचगल्ले यांचे प्राथमिक शिक्षण अतनूर येथे झाले असून त्यांनी डी.एड. केल्यानंतर प्राथमिक शिक्षक म्हणून आपल्या सेवेला प्रारंभ केला. शिक्षक असताना त्यांनी शिक्षण विभागातील मोठ्या पदांवर नियुक्तीसाठीचीही तयारीही सुरू ठेवली. तद्नंतर त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गटशिक्षणाधिकारी पदावर नियुक्ती झाली. गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कार्याचा ठसा शिक्षण विभागात उमटवला. उल्लेखनीय कामगिरीबद्दल आता त्यांची शिक्षणाधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. पदोन्नतीने जिल्हा परिषद बीड येथे शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हा परिषद लातूरच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक वंदना फुटाणे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नूतन शिक्षणाधिकारी पवार, उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार, इस्माईल शेख उपस्थित होते. त्यांच्या या यशामुळे त्यांच्या अतनूर ता. जळकोट या मूळ गावीही आनंद व्यक्त होत आहे. या यशामुळे तालुक्यातील तरुणांना स्पर्धात्मक परीक्षा व प्रशासकीय सेवेकडे आकर्षित होण्यास प्रेरणा मिळणार आहे. याबद्दल जळकोट च्या तहसीलदार सौ.सुरेखा स्वामी, गटशिक्षणाधिकारी जयसिंह देशमुख, ग्राहक संरक्षण परिषदेचे शासन नियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हा संघटक बी.जी.शिंदे, पोलीस दक्षता समितीचे मराठवाडा अध्यक्ष एस.बी.जी.शिंदे, जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एस.जी.शिंदे, युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने मराठवाडा अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शाखाध्यक्ष, येथील सरपंच चंद्रशेखर पाटील, शिवसेनेचे जिल्हासरचिटणीस विकास सोमुसे-पाटील, जळकोट शिवसेनेचे तालुका संघटक मुक्तेश्वर पाटील, जळकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोविंदराव येवरे-पाटील, संचालक मुक्तेश्वर येवरे-पाटील, गव्हाणकर यांच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षण उपसंचालक पटवेकर, शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, मुख्याध्यापक डि.एस.नरसिंगे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राहूल गायकवाड, संजय राऊत, हराळे सर, नरसिंग घोडके, छगन घोडके, चंदू घोडके, सौ.लक्ष्मी घोडके, सुनिता घोडके, रावणकोळा परिषदेचे मुख्याध्यापक संग्राम दादाराव बंडरे चिंचोलीकर, शिक्षक श्रीधर गव्हाणे-पाटील, गव्हाण जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त साहेबराव गव्हाणे-पाटील, शिक्षक विजय गव्हाणे-पाटील, अतनूर सज्जाचे तलाठी अतिक शेख, माजी सैनिक केशवराव पाटील, इस्माईल शेख, माजी सैनिक आयुब मुंजेवार, शेख, रफीयोददीन मुंजेवार, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मगदूम मुंजेवार, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, ग्रामस्थ यांनी आनंदोत्सव साजरा करीत पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments