बनशेळकी रोड येथे भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना विविध दाखले वाटप.
उदगीर:जिल्हाधिकारी कार्यालय लातूर व तहसील कार्यालय उदगीर यांच्या वतीने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे,उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांच्या सूचनेनुसार दिनांक:५ मार्च रोज मंगळवारी बनशेळकी रोड उदगीर येथे भटक्या विमुक्त जाती व जमाती मधील वंचित लाभार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले वाटप करून मतदार नाव नोंदणी करण्यात आली.तहसीलदार राम बोरगावकर यांच्या हस्ते शिधापत्रिका, विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.भटक्या जाती जमातीतील लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले भटक्या विमुक्त जाती जमातीतील लोकांच्या वंचित असलेल्या या प्रश्नाकडे लक्ष देवुन त्यांना त्यांचा हक्क व न्याय देणेसाठी सूचना देण्यात आल्या.यावेळी नायब तहसीलदार एस.पी.बेंबळगे,मंडळ अधिकारी शंकर जाधव,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सय्यद जानीमिया ,अनिल मुदाळे माजी नगरसेवक ,अमर सूर्यवंशी ,कृष्णा दशरथ, भटक्या विमुक्त जाती जमातीचे कार्यकर्ते सायलू नंदीवाले, पिराजी गंगारपे, मारुती भीमराव मामडगे,गंगाधर खडमींचे,मारुती खडमिंचे,लक्ष्मण खडमींचे तलाठी पंकज कांबळे या प्रभागातील मतदार यादीप्रमाणे सर्व बीएलओ
आशा ताई अंगणवाडी सेविका,
महा-ई-सेवा केंद्राचे राहुल रक्षाळे,पुंडलिक जाधव,भटक्या विमुक्त जाती जमातीच्या विविध संघटनेचे पदाधिकारी महिला व नागरिक उपस्थित होते.
0 Comments