Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

पोवाडा पथनाट्यातून होणार उदगीर तालुक्यात मतदान जनजागृती,उपविभागीय अधिकारी शुशांत शिंदे यांनी केली कर्मचाऱ्यांची नेमणूक

पोवाडा पथनाट्यातून होणार उदगीर तालुक्यात मतदान जनजागृती,उपविभागीय अधिकारी शुशांत शिंदे यांनी केली कर्मचाऱ्यांची नेमणूक

उदगीर:केंद्रीय निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी राज्यसरकार यांच्या निर्देशानुसार राज्याच्या आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने.विविध पथके नेमून पोवाडा पथनाट्याच्या माध्यमातून तालुक्यात विविध गावात मतदान जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने तालुका निवडणूक निर्णय अधिकारी  यांच्या तपासणी सूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या अधिकारानुसार व  लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम २० (अ) १५९ मधील तरतुदीनुसार लोकसभा निवडणुकीची कामे सुरळीत प्रथम प्राधान्याने व मुदतीत पूर्ण होण्याच्या दृष्टीकोणातून श्री शुशांत शिंदे सहाय्यक निवडणूक अधिकारी ४१ लातूर अ.जा. लोकसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी उदगीर यांनी कर्मचाऱ्यांची स्विफ्ट कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृती करण्याकरिता अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे.उदगीर तालुक्यातील नळगीर येथे २२ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोवाडा पथनाट्य मतदान जनजागृती मोहीम राबविणार, वाढवणा (बु) येथे २६ मार्च रोजी तहसीलदार  राजेश बेंबळगे,२७ मार्च रोजी नागलगाव येथे नायब तहसीलदार राजेश बेंबळगे,२८ मार्च रोजी तोंडार येथे नायब तहसीलदार राजेश खरात जळकोट १ एप्रिल रोजी मोघा येथे नायब तहसीलदार राजेश खरात,२ एप्रिल रोजी हेर येथे तहसीलदार एम.क्षीरसागर ३ एप्रिल रोजी देवर्जन येथे नायब तहसीलदार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली  वरील  गावात सांयकाळी ७ वाजता पोवाडा पथनाट्यातून मतदान जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना सहा. निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत शिंदे यांनी नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात