मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, उपजिल्हाधिकारी व तहसीलदार मार्फत राज्यपालांना निवेदन
उदगीर:जळकोट ,देवणी व उदगीर तालुक्यातील मराठा आंदोलकावर बेकायदेशररित्या दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे असे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यपालांना देण्यात आले, सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाची परवानगी घेऊन व प्रशासनाला सहकार्य करीत शांततेच्या मार्गाने रास्ता रोको आंदोलन केले होते,याबद्दल पोलीस प्रशासन तसेच वरिष्ठांना कळविण्यात आले होते. या संदर्भात कुठेही अनुचित प्रकार घडला नव्हता तरी आंदोलकावर वीस-बावीस दिवसानंतर जळकोट,देवणी,उदगीर तालुक्यात बेकायदेशीर रित्या गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत या संदर्भात तात्काळ गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा समाजाच्या रोशाला समोर जावे लागेल असे निवेदन १८ मार्च रोज सोमवारी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उदगीर यांच्या मार्फत राज्याचे महामहिम राज्यपाल रमेश बैस यांना देण्यात आले. यावेळी दत्ता पाटील, गोविंद बिरादार ,राम रावणगावे, नितीन मोरतळे सतीश पाटील मानकिकर, राहुल बिरादार ,बाबासाहेब पाटील आकाश माने, चिखले देविदास, विठ्ठल महाराज, गोपीनाथ बिरादार, दिनकर बिरादार ,प्रशांत बिरादार, राहुल अतणुरे, प्रमोद काळोजी दत्ता सागर , कबनुरे भानुदास, अमोल पाटील ,पंकज कालनी ,पवन ढोबळे, शंकर मोरे आदी उपस्थित होते,
0 Comments