Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

कृषि महाविद्यालयात ड्रोन पायलट पदाकरीता परिसर मुलाखतींचे आयोजन

कृषि महाविद्यालयात ड्रोन पायलट पदाकरीता परिसर मुलाखतींचे आयोजन

उदगीर  :  परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाशी संलग्नित  उदगीर येथील कृषि महाविद्याल्यातील ( डोंगरशेळकी तांडा ) , बी. एस्सी (मानद) कृषि पदवी उत्तीर्ण व पदवी अंतिम सत्रातील " अनुभवाधारित कौशल्य  विकास अभ्यासक्रमाच्या   विद्यार्थ्यांसाठी , मुंबई येथील " प्रायम सोल्युशन प्रा. लि  " *सलाम किसान* "या कृषि क्षेत्रातील नामांकित व अग्रन्य  कंपनीच्या  रोजगार निर्मिती उपक्रमांतर्गत ,  ड्रोन पायलट  पदासाठी परिसर (कॅम्पस इंटरव्यूज ) मुलाखतींचे , दि.१५ मार्च ,२०२४ रोजी ,  महाविद्यालयातील विद्यार्थी समुपदेशन व रोजगार कक्षांतर्गत , नियोजन व आयोजन करण्यात आले.
      प्रारंभी , स्वागत व मार्गदर्शन कार्यक्रम , या महाविद्यालयाचे प्राचार्य ङॉ . अंगदराव सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला . त्यामध्ये ,  प्रायम सोल्युशनस प्रा. लि . ( मुंबई ) " सलाम किसान " च्या  उपक्रमाचे  मानव संसाधन व्यवस्थापक *श्रीयुत सुमित मुंगले* यांचा , उपप्राचार्य  ङॉ.आशोकराव पाटील, ङॉ.आनंद दापकेकर यांनी यथोचित सत्कार केला . याप्रसंगी ,  सुमित मुंगलेनी त्यांच्या कंपनीची ओळख  , उद्दिष्टे , कार्यक्षेत्र , संशोधन , राज्य व राष्ट्रीय पातळीवरील कृषि क्षेत्रातील योगदान इत्यादी विषयी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली आणि कृषिउद्योग - व्यवसाय क्षेत्रांमध्ये कृषि पदवीधरांसाठी अमाप संधी उपलब्ध असल्याचे नमूद केले .
      तदनंतर ,*श्रीयुत सुमित मुंगले* यांनी , मुलाखतींसाठी उपस्थित विद्यार्थी - विद्यार्थिनीची , सलाम किसान ॲपच्या माध्यमातून परीक्षा, समूह चर्चा व वैयक्तिक मुलाखती अशा तीन क्षमता चाचण्यां घेतल्या आणि त्यामध्ये गुणानुक्रमे सर्वोत्कृष्ट अशा  एकूण १४ विद्यार्थी - विद्यार्थिनीची , कंपनीच्या तज्ञ चमूकडून घेण्यात येणाऱ्या चाचणीसाठी / मुलाखतींसाठी अंतिम निवड केली . यामध्ये , महाविद्यालयातील चावरे रामेश्वर , शिंदे अनिकेत , देशमुख जयराज , जावळे गजानन , शिरमेवार मनीष , हेंबाडे ज्ञानेश्वर , वनराजे उमाकांत , माळी आदित्य , पाटील श्रीपाद  , शेल्हाळकर अपूर्वा , खेळगे साक्षी , सूर्यवंशी वैशाली व राठोड भागुबाई  इत्यादींची निवड करण्यात आली  .
    सदरहू परिसर मुलाखतींचे नियोजन व आयोजन हे महाविद्यालयातील " विद्यार्थी समुपदेशन व रोजगार कक्षाचे अध्यक्ष  ङॉ.शिवशंकर वानोळे ,सचिव  ङॉ.दिपक पानपट्टे , प्रा. एस.आर खंङागळे ङॉ. सागर खटके , प्रा. शितल पाटील व प्रा. प्रमोद सराफे यांनी केले .
     नंदिग्राम कृषि एवंम ग्रामविकास संस्थेचे (सुगाव ) मा. अध्यक्ष डॉ. संग्रामजी पटवारी , सचिव मा. गंगाधररावजी दापकेकर आणि समस्त प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी  ,निवड झालेल्या विद्यार्थिनी  - विद्यार्थ्यांचे  कौतुक व अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात