Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

लातूर शासकीय महिला तंत्रनिकेतन येथील स्ट्राँग रूमची जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी केली पाहणी*

*लातूर शासकीय महिला तंत्रनिकेतन येथील स्ट्राँग रूमची जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी केली पाहणी*

लातूर, दि. 22 : लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदानानंतर मतदान यंत्रे (ईव्हीएम) मशीन लातूर येथील शासकीय महिला तंत्रनिकेतन येथील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येणार आहेत. या स्ट्राँग रूमची आज जिल्हधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी संयुक्त पाहणी केली. तसेच येथील मतमोजणी कक्षातील व्यवस्थेचा आढावा घेतला.

प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, पोलीस उपाधीक्षक जी. एल. भातलवंडे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

लातूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मतदान यंत्रे शासकीय महिला तंत्रनिकेतन येथील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येणार असल्याने त्याबाबतची पूर्वतयारी सुरु आहे. जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक श्री. मुंडे यांनी स्ट्राँग रूमची, मतदान कक्ष आणि परिसराची संयुक्त पाहणी केली. यावेळी त्यांनी स्ट्राँग रूममधील व्यवस्था, मतमोजणी कक्षातील बैठक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था आदी बाबींचा आढावा घेतला. तसेच या अनुषंगाने संबंधितांना सूचना दिल्या.

Post a Comment

0 Comments

जाहिरात