राज्य उत्पादन शुल्क व उदगीर ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाईत हजारो लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त
उदगीर:राज्य उत्पादन शुल्क विभाग उदगीर व उदगीर ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत उदगीर तालुक्यातील कौळखेड परिसर व नागलगाव परिसरात विविध ठिकाणी छापे टाकून १ लाख ९६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एकूण ७ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून या कारवाईत हातभट्टी तयार करण्याचे ४१०० लिटर रसायन,७४ लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली,२३ मार्च रोजी सकाळी ६ ते १० वाजेच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रमेश चाटे,दुय्यम निरीक्षक एन.पी.रोठे.सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, जवान जे.आर.पवार.एस.जी.बागलवाड, दुय्यम निरीक्षक आर.के.मुंढे,पोलीस कॉन्स्टेबल नामदेव धुळशेट्टे,पोलीस नाईक नाना शिंदे,एन.एस.चेवले,लटपटे,रवी फुलारी,चालक वि.वि.परळीकर, महिला आर्या मॅडम यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे,या कारवाई मुळे उदगीर तालुक्यात अवैध दारू विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.
0 Comments