Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

मातंग समाजाची बदनामी करणाऱ्यांना माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी चांगलेच फटकारले

मातंग समाजाची बदनामी करणाऱ्यांना माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी चांगलेच फटकारले 

उदगीर प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचे लातूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुधाकर श्रंगारे यांच्या प्रचारार्थ उदगीर शहरात मंगल कार्यालयात जाहीर सभा घेण्यात आली. या सभेसाठी महिला आघाडीच्या महाराष्ट्राच्या प्रमुख चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रिडा व युवक कल्याण व बंदरे मंत्री ना.संजय बनसोड,माजी आ.गोविद केंद्रे, मा आ सुधाकर भालेराव, भाजपाचे उमेदवार सुधाकर श्रंगारे यांच्या सह अनेक मान्यवर  यावेळी स्टेजवर उपस्थित होते.जमलेल्या मतदार बांधवांना उमेदवार सुधाकर श्रंगारे यांना मतदान करण्याचे आवाहन करत असताना माजी.आ.सुधाकर भालेराव यांनी मातंग समाजाला ठरवून बदनाम करण्याचे षडयंत्र चालू असून हे रोखणे गरजेचे आहे.मातंग समाज हा भारतीय जनता पार्टीचा मतदार असून भाजपाच्या उमेदवारास भरघोस मते देवून प्रचंड मतानी निवडून आणल्या शिवाय गप्प बसणार नाही.भाजपातील काही ठराविक नेते मातंग समाजा बद्दल अपप्रचार करून मातंग समाजाला बदनाम करीत आहेत .मातंग समाज खासदार सुधाकर श्रृंगारे यांना प्रचंड मतानी निवडून आणणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेषा असल्याचे मा आ सुधाकर भालेराव यांनी जाहीर सभेत बोलताना सांगीतले. जर मातंग समाजाला बदनाम कराल तर याद राखा असा ईशाराही यावेळी दिला.जर मातंग समाजाची गरज नसेल तर खुलेआम सांगा की आम्हाला तुमची गरज नाही. आम्ही गपचूप घरी बसू विनाकारण समाजाची बदनामी खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट मत माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी  ईशारा दिला आहे.उदगीर विधान सभेतला मातंग समाज हा भारतीय जनता पार्टीचा मतदार आहे मतदार राहिल यावर शंका घेण्याचे कारण नसल्याचेही माजी आ सुधाकर यांनी मागदर्शन करते वेळी मतदाराच्या साक्षीने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मा आ सुधाकर श्रंगारे यांना जाहीर सभेत दिली आहे. यावेळी भाजपाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते महिला मंडळ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात