शिरोळ जाणापूर चेक पोस्टवर विदेशी दारुसह ८३ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त
उदगीर तालुक्यातील शिरोळ जाणापूर चेक पोस्टवर विदेशी दारु व मोटारसायकल सह ८३ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून दोघा आरोपीविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शिरोळ जाणापूर चेक पोस्टवर २५ एप्रिल रोज गुरुवारी सकाळी ९ वाजता मोटारसायकल क्रमांक के.ए.३८ क्यू ५००३ या दुचाकीवरून विदेशी दारू घेवून जात असताना पोलिसांनी दुचाकी स्वाराला ताब्यात घेतले असता पिवळ्या पोत्यामध्ये ९० एम.एलच्या,चॉईस व्हिस्की ९ बॉक्समध्ये ८६४ बॉटल ज्याची किंमत ३४५६० रुपये,दोन खपटी बॉक्समध्ये ओल्ड व्हिस्की १८० एम.एलच्या ७२ बॉटल ज्याची किंमत ९००० हजार रुपये,व ४० हजार रुपयांची दुचाकी असा एकूण ८३ हजार ५६० रुपयांचा सवाई माल विनापास चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने मोटारसायकल वरून घेवून जात असताना मिळून आले,अशी फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल सागर संजय पाटील यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून आरोपी विनायक व्यंकट वरदाळे वय ३५ वर्ष राहणार बाराळी ता.औराद जि.बिदर,राम भीमना वडियार वय ४० वर्ष राहणार बाराळी ता.औराद जि.बिदर यांच्यावर गुरंन २३४/२४ कलम ६५ (अ) (ई) व ८१.८२ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार २५ एप्रिल रोज गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बनसोडे हे करीत आहेत.
0 Comments