Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर-देगलूर महामार्गावरील श्रीकृपा सुपर मार्केट चे उद्घाटन

उदगीर-देगलूर महामार्गावरील श्रीकृपा सुपर मार्केट चे उद्घाटन

उदगीर / प्रतिनिधी
शहरातील उदगीर-देगलूर महामार्गावरील श्रीकृपा सुपर मार्केट, डॉ.जटाळे कॉम्प्लेक्स, सोनवणे पेट्रोल पंपासमोर देगलूर रोड,उदगीर स्थित या नवीन फर्माचा शुभारंभ रविवारी सायंकाळी ह भ.प.गुरुवर्य महराज व श्री.सत्यनारायण महापूजेने करण्यात आला.
यावेळी क्रीडामंत्री संजय बनसोडे, उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, दत्तात्रय विनायकराव भोसले, सौ.दिपाली दत्तात्रय भोसले, धनराज शंकरराव जाधव, सौ.वनमाला धनराज जाधव, विनायकराव गयानोबा भोसले, सौ.दैवशाला विनायकराव भोसले, डॉ.सतीश जाधव, प्रकाश बुरटे, डॉ.रणजीत जाधव, बब्रुवान जाधव, अक्षय जाधव, मलिकार्जुन चिलरगे, नेमीचंद पाटील, संदीप मजगे, व्यंकट जाधव, महादेव गठोडे, निखिल घोडके, अतुल बिरादार, पृथ्वीराज दत्तात्रय भोसले, हेमंत दत्तात्रय भोसले उपस्थित होते.
यावेळी ह.भ.प.महाराज म्हणाले, कोणताही व्यवसाय करा पण तो सर्वसामान्य गोरगरीब लोकांना आरोग्यदायी, सत्विक, उत्कृष्ट दर्जा आहार व आरोग्यदायक अन्नधान्य असावा तसेच या श्रीकृपा सुपर मार्केट मधून शुद्ध, सात्विक आरोग्यदायी, निवडलेले, विना भेसळीचे आरोग्यास उपयुक्त असे गृहपयोगी वस्तूची, अन्नधान्याची विक्री व्हावी. तसेच सर्वसामान्य ग्राहक या शुद्ध, सात्विक, गृहउपयोगी, आरोग्यदायी, रास्तभावाने संतुष्ट होऊन गेले पाहिजेत असे म्हणाले, यावेळी श्रीकृपा सुपर मार्केटचे संचालक दत्तात्रय विनायकराव भोसले व संचालिका सौ.दिपाली दत्तात्रय भोसले, चि.पृथ्वीराज दत्तात्रय भोसले, चि.हेमंत दत्तात्रय भोसले यांनी सर्वांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी तीर्थप्रसाद व अल्पोहर महाप्रसाद देण्यात आला.

Post a Comment

0 Comments

जाहिरात