Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

भगीरथ राजानगर रस्त्याची दयनीय अवस्था ; २० वर्षापासून नागरिक दुरूस्तीच्या व नवीन रस्त्याच्या प्रतीक्षेत!

भगीरथ राजानगर रस्त्याची दयनीय अवस्था ; २० वर्षापासून नागरिक दुरूस्तीच्या व नवीन रस्त्याच्या प्रतीक्षेत!

उदगीर / प्रतिनिधी
शहराच्या लगत असलेल्या अवघ्या १०० मीटर अंतरावर असणाऱ्या भगीरथ राजा नगर ते कमलेश्वर माध्यमिक व प्राथमिक विद्यालय ला जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. परिणामी प्रभागातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत उदगीर नगरपरिषद प्रशासनास व शासनास निवेदन सादर करूनही रस्त्याची बिकट अवस्था गेल्या २०-२५ वर्षापासून कायम आहे.
शहरालगत व नगरपरिषद मधील समावेश असणारे भगीरथ राजा नगर, धोंड कॉलनी, जळकोट रोड स्थित कमलेश्वर कन्या माध्यमिक व प्राथमिक विद्यालय अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर हा प्रभाग वसलेले आहे. उदगीर-नांदेड मार्गावरून शहरालगत राज्य मार्ग प्रभागात जाण्यासाठी १०० मीटर अंतर पार करावे लागते. या अर्धा किलोमीटर अंतरावरील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता आहे की नाही कळायला मार्ग नाही. गत वर्षात भगीरथ राजा नगर, धोंड कॉलनी ते कमलेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय कडे येणाऱ्या अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर रस्ता करावा व विद्यार्थ्यांसह लहान बालकांची चिखलातून पायपीट कमी व्हावी, अशी मागणी असतानाही अर्धा ते एक किलोमीटर अंतराचा रस्ता पार करण्यासाठी किमान २० मिनिटे लागतात. यावरून रस्त्याची स्थिती सर्वसामान्यांना कळून येईल. रस्त्यावर दगड उखडून वर आले आहेत. यामुळे दोन चाकी वाहन तरी काय, पायी चालताही येत नाही. पायी चालतानाही मोठी तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी प्रभागातील गल्लीत अति गंभीर रुग्णास हॉस्पिटलला घेऊन जाण्याकरिता वाहनही भगीरथ राजा नगर, धोंड कॉलनीत यायला तयार होत नाही. प्रभागात कधी ऑटो चालक येतही नाहीत. रस्ताच पूर्णपणे उघडला असून जागोजागी पडलेले खड्डे, पायपीट करणाऱ्या प्रभागातील जेष्ठ नागरिक, वयोवृद्ध, लहान बालके, महिला, पुरुष, विद्यार्थी, विद्यार्थी विद्यार्थिनी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी व प्रभागात राहणारी माणसं आहे की नाही, असा प्रश्न भगीरथ राजा नगर, धोंड कॉलनी वाशी उपस्थित करीत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी प्रभागातील नागरिक करीत आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात