ऐकूर्का तलावावरील मोटारी प्रशासनाकडून जप्त,तहसीलदार राम बोरगावकर यांची कारवाई
उदगीर:लातूरचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम व उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार राम बोरगावकर यांनी मिटवला एकुरका व चांदेगाव गावचा पाणी प्रश्न उदगीर तालुक्यातील पाणीटंचाईच्या दृष्टिकोनातून मौजे एकुरका खेरडा कल्लूर येथे पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता भासत होती त्या अनुषंगाने निवडणुक संपताच दुसऱ्या दिवशी तहसीलदार राम बोरगावकर यांनी सर्व लघुपाटबंधारे विभाग गट विकास अधिकारी तलाठी ग्रामसेवक व पाणीपुरवठाशी संबंधित असलेल्या सर्व यंत्रणा विद्युत महावितरण यांची दिनांक १० मे रोजी बैठक घेऊन पाणीटंचाईवर व उपाय योजना वर तात्काळ करावी करण्याचे आदेश सर्व यंत्रणांना दिले तसेच एकुरका येथे तळ्यात मृत पाणीसाठा होता गावामध्ये सर्व पाणी स्रोत संपले असून एकुरका साठवन तलावात काही खाजगी व्यक्तीने खड्डे खोदून त्यात पाणबुडी मोटर टाकले होते याची माहिती मिळताच स्वतः जातीने तहसीलदार राम बोरगावकर यांनी गटविकास अधिकारी सुरडकर संबंधित साठवण तलावाचे शाखा अभियंता तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक यांना सोबत घेऊन सदर तलावर बसविण्यात आलेल्या मोटरी वायर जप्त करून एकुरका गावचा पाणी प्रश्न मिटवला तसेच तिरू मध्यम प्रकल्प वरील व चांदेगाव येथील साठवण तलावावर काही खाजगी व्यक्तीचे पाणबुडी विद्युत मोटार बसवण्यात आले होते त्याही ठिकाणी भेट देऊन कारवाई केली, पाणीटंचाईच्या संदर्भाने सर्व आजूबाजूच्या गावातील लोकांना जागृत करून पाण्याचे महत्व पटवून देऊन पाणीटंचाई वर मात करण्यासाठी सर्व खाजगी लोकांनी लावलेल्या मोटारी काढून घेण्याबाबत आवाहन केले यावेळी संबंधित गावचे तलाठी मंडळ अधिकारी शाखा अभियंता सरपंच उपसरपंच पोलीस पाटील उपस्थित होते.
0 Comments