भाजी मार्केट येथे पाण्याची वॉल फुटली,प्रशासनाचे दुर्लक्ष, व्यापाऱ्यांनी व्यक्त केला संताप,बहुजन विकास अभियानाचा आंदोलनाचा इशारा
उदगीर शहरातील भाजी मार्केट येथे गेली दोन महिन्यांपासून पाण्याची वॉल फुटल्याने पाणी रस्त्यावर साचत आहे या पाण्यामुळे भाजी विक्रेते व्यापारी व नागरिक त्रस्त झाले असून व्यापाऱ्यांनी नगरपरिषदेला वॉल बंद करण्याची वेळोवेळी मागणी केली परंतु नगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा संताप व्यापाऱ्यांनी व्यक्त केला,नगरपालिका प्रशासन दररोज भाजी विक्रेते,फळ विक्रेत्यांकडून १० रुपये कर वसूल करतात,व्यापाऱ्यांनी कर वसुली कर्मचाऱ्यांना वॉल बंद करण्याची विनंती केली मात्र व्यापाऱ्यांच्या विनंतीकडे दोन महिन्यांपासून नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष करत आहे,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी शहरातील नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन करीत असताना दुसरीकडे मात्र दोन महिन्यांपासून भाजी मार्केट येथे वॉल मधून रस्त्यावर हजारो लिटर पाणी वाया जात असून रस्त्यावर साचत असलेल्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले,याकडे मुख्याधिकारी सुंदर बोंदर लक्ष देतील का?असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला,भाजी मार्केट येथील वॉल मधून येणारा पाणी प्रशासनाने तात्काळ बंद करावा असा संताप भाजी विक्रेते व व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे,तर बहुजन विकास अभियान प्रमुख संजयकुमार कांबळे यांनी भाजी मार्केट येथील वॉलची दुरुस्ती करून व्यापाऱ्यांची होणारी गैरसोय थांबवावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा प्रशासनाला दिला आहे.
0 Comments